टाटा पंच फेसलिफ्टची डिलिव्हरी सुरू; नव्या डिझाइनसह टर्बो इंजिन आणि 360-डिग्री कॅमेराची दमदार एन्ट्री

Published on -

New Tata Punch : टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एन्ट्री-लेव्हल एसयूव्ही टाटा पंच फेसलिफ्टची अधिकृतपणे डिलिव्हरी सुरू केली आहे.

नवीन डिझाइन, आधुनिक इंटीरियर, प्रगत सेफ्टी फीचर्स आणि प्रथमच उपलब्ध झालेल्या 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमुळे ही कार ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

किफायतशीर किमतीत अधिक फीचर्स देण्याच्या टाटाच्या धोरणाचा हा आणखी एक मजबूत दाखला मानला जात आहे.

नवीन टाटा पंच फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपये इतकी आहे. ही कार प्रिस्टाइन व्हाइट, डेटोना ग्रे, सायंटाफिक, कॅरामल, बंगाल रूज आणि कुर्ग क्लाउड्स अशा सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

तसेच काही व्हेरिएंट्समध्ये काळा किंवा पांढरा ड्युअल-टोन रूफचा पर्यायही देण्यात आला आहे.

पंच फेसलिफ्ट सहा ट्रिम लेव्हल्समध्ये सादर करण्यात आली असून स्मार्ट, प्युअर, प्युअर प्लस, अ‍ॅडव्हेंचर, अकंप्लिश्ड आणि अकंप्लिश्ड प्लस एस असे व्हेरिएंट्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

इंजिन पर्यायांच्या बाबतीत, पंच फेसलिफ्टमध्ये 1.2L NA पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते i-CNG पर्यायासहही उपलब्ध आहे.

मात्र या फेसलिफ्टचे मुख्य आकर्षण म्हणजे 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन, जे अधिक पॉवर आणि स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव देते.

टर्बो पेट्रोल इंजिन अ‍ॅडव्हेंचर ट्रिममध्ये मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते, ज्याची किंमत ₹8.29 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह देण्यात आले आहे.

डिझाइनच्या बाबतीत, नवीन पंचने आपला बॉक्सी आणि कॉम्पॅक्ट लूक कायम ठेवत अधिक प्रीमियम टच मिळवला आहे.

स्लिम एलईडी DRLs, ब्लॅक फ्रंट ग्रिल, नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि अपडेटेड बंपर यामुळे कार अधिक आकर्षक दिसते.

फीचर्सच्या यादीत पंच फेसलिफ्ट खूपच पुढे आहे. यात 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, 10.24 इंच टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, हर्मन ऑडिओ सिस्टम यांसारखी अत्याधुनिक फीचर्स मिळतात. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 366 लिटर बूट स्पेस देण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या बाबतीतही टाटा पंच फेसलिफ्ट अव्वल ठरते. यात 6 एअरबॅग्ज, ESC, ABS, TPMS, 360-डिग्री कॅमेरा आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स स्टँडर्ड फीचर्स म्हणून देण्यात आले आहेत.

त्यामुळे किफायतशीर दरात सुरक्षित, स्टायलिश आणि फीचर-लोडेड एसयूव्ही शोधणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन टाटा पंच फेसलिफ्ट हा एक मजबूत पर्याय ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe