New Tata Tigor:- टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय सेडान टाटा टिगोरचे नवीन मॉडेल सादर केले असून हे वाहन २३ किमी प्रति लिटरचे मायलेज आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येते. आकर्षक डिझाइन, उच्च कार्यक्षमता आणि प्रीमियम इंटिरियरमुळे ही कार खरेदीदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
उत्कृष्ट मायलेज आणि दमदार इंजिन
नवीन टिगोरमध्ये १.२ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.जे इंधन कार्यक्षमतेसह उत्कृष्ट पॉवर देते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध आहे. त्यामुळे शहरातील ट्रॅफिक असो किंवा हायवेवर लांब ड्रायव्हिंग या दोन्ही ठिकाणी ही कार उत्कृष्ट कामगिरी करते.
आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम लुक
नवीन टाटा टिगोरच्या डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.जे या कारला अधिक आकर्षक बनवतात. यामध्ये नवीन सिंगल ग्रिल, सुधारित फॉग लॅम्प डिझाइन, एलईडी हेडलाइट्स आणि डीआरएल समाविष्ट आहे. याशिवाय नवीन बॉडी कलर्स, स्पोर्टी साइड स्कर्ट्स आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यामुळे कार अधिक स्टायलिश दिसते.
आधुनिक आणि आरामदायी इंटीरियर
नवीन टिगोरमध्ये प्रीमियम आणि आधुनिक इंटीरियर देण्यात आले आहे ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होतो.याशिवाय ७-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन,स्मार्ट रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स,प्रीमियम फॅब्रिक सीट्स,
स्वयंचलित हवामान नियंत्रण,क्रूझ कंट्रोल आणि मल्टीफंक्शन स्टीअरिंग व्हील,कनेक्टिव्हिटी आणि टिगोरमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट करणारा इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, USB आणि AUX पोर्ट, तसेच हाय-क्वालिटी म्युझिक सिस्टम दिली आहे.
सुरक्षिततेचे फीचर्स
टाटा टिगोर ही NCAP क्रॅश टेस्टमध्ये उच्च रेटिंग मिळवणारी कार आहे.त्यामुळे तिची सुरक्षितता सिद्ध झालेली आहे. या मॉडेलमध्ये सुरक्षिततेच्या उत्तम वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.जसे की,
ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी ड्युअल एअरबॅग्ज,EBD सह ABS,रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा,ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, मागच्या दरवाजाला चाइल्ड लॉक व आरामदायी प्रवासासाठी अतिरिक्त वैशिष्ट्ये टिगोरमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात आले आहेत.