Nissan Magnite Offers: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन SUV कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात सुरु असणाऱ्या डिस्कॉऊंट ऑफरचा फायदा घेत बाजारात धुमाकूळ घालणारी आणि ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी निसान इंडियाची लोकप्रिय SUV कार Nissan Magnite सहज आणि अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो Nissan Magnite भारतीय बाजारात उत्तम फीचर्स आणि जबरदस्त मायलेज तसेच बेस्ट लूकमुळे नेहमी चर्चेत राहते. सध्या कंपनी या कारवर तब्बल 57 हजारांची सूट देत आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
Nissan Magnite ऑफर
आम्ही तुम्हाला सांगूया की मॅग्नाइटवर मे महिन्याच्या ऑफर्समध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस यांचा समावेश आहे.
Nissan Finance द्वारे लाभ घेतल्यास कंपनी गोल्ड सर्व्हिस पॅक आणि वार्षिक 6.99 टक्के व्याजदराने विशेष वित्त ऑफर देखील देत आहे.
XE वगळता मॅग्नाइटच्या सर्व व्हेरियंटवर ग्राहक रु. 18,000 चा एक्सचेंज बोनस मिळवू शकतात. अॅक्सेसरीजवर 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आहे जे व्हेरियंट आणि खरेदीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. XE वगळता सर्व व्हेरियंटवर 7,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळू शकते.
Nissan Magnite फीचर्स
Nissan Magnite SUV मध्ये अनेक उत्तम फीचर्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात 7-इंचाची TFT स्क्रीन, अॅम्बियंट मूड लाइटिंग, एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स आहेत.
Nissan Magnite किंमत
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.99 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 11.02 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच या कारचा लूकही खूप स्टायलिश देण्यात आला आहे.
हे पण वाचा :- Scooters Under 1 Lakh : Yamaha पासून Hero पर्यंत अवघ्या 1 लाखात खरेदी करा ‘ह्या’ स्टायलिश स्कूटर ; पहा फोटो