Nissan Magnite SUV : भारतीय बाजारात SUV ची मागणी मोठ्या प्रमाणत होत आहे. अनेक कंपन्यांना आपल्या शानदार मायलेज असणाऱ्या SUV खरेदी करत आहेत. त्याशिवाय अनेक कंपन्या एकमेकींना कडवी देत असतात. साहजिकच बाजारात SUV ची चांगली मागणी आहे.
त्यामुळे या SUV च्या किमतीही जास्त आहेत. परंतु आता तुम्ही 6 लाखांची SUV अवघ्या 5.33 लाखांत सहज खरेदी करू शकता. लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या कारण ऑफर केवळ 31 ऑगस्टपर्यंत वैध आहे.कंपनीकडून तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल.
जाणून घ्या Nissan Magnite वर मिळणारी ऑफर
ऑफरचा विचार करायचा झाला तर Nissan कडून या महिन्यामध्ये Nissan मॅग्नाइटवर एकूण 67 हजार रुपयांपर्यंतचा फायदा देण्यात येत आहे. इतकेच नाही तर यावर गोल्ड सर्व्हिस पॅकही देण्यात येत आहे. यात तुम्हाला अंदाजे 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज, 15,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सवलत आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बोनसचा लाभ मिळेल. त्याशिवाय त्याच्या ऑनलाइन बुकिंगवर 2000 रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जात आहे.
हे लक्षात घ्या की जर तुम्ही कंपनीच्या फायनान्स कंपनी Nissan Renault कडून 3.93 लाख रुपयांना 2 वर्षांसाठी Magnite खरेदीसाठी फायनान्स केला, तर तुम्हाला 6.99% या व्याजदराने कर्ज मिळू शकते. त्यामुळे या मॉडेलवर तुम्हाला एकूण 67,000 रुपयांचा फायदा मिळेल. तुम्हाला या ऑफरचं लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे कारण ही ऑफर फक्त या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत वैध असणार आहे. कंपनीने या कारवर एकूण 82 हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
वैशिष्ट्ये
या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, स्मार्ट कनेक्टिव्हिटी, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक आणि अराउंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स कंपनीने दिली आहेत. कारच्या केबिनमध्ये एबीएस, ईबीडी, एचएसए, एचबीए यांसारख्या शानदार फीचर्ससह 7-इंचाची टीएफटी स्क्रीन, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस चार्जिंग, एअर प्युरिफायर, रियर पार्किंग सेन्सर्स, अॅम्बियंट मूड लाइटिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट फीचर्स पाहायला मिळतील.
इंजिन
कंपनीच्या या कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 100hp पॉवर आणि 160Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 1.0-लीटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील ,आलेलं. कारचे इंजिन 71hp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करते. महत्त्वाचे म्हणजे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आला आहे.
स्पर्धा
भारतीय बाजारपेठेत Nissan Magnite ही जबरदस्त कार Hyundai Venue, Tata Panch सारख्या छोट्या SUV सोबत स्पर्धा करते.