Nissan Magnite Update: भारतीय बाजारात कमी किमतीमध्ये भन्नाट मायलेज आणि बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या एकापेक्षा एक कार्स उपलब्ध आहे.
ज्यांना खरेदीसाठी बाजारात गर्दी देखील पाहायला मिळत आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला अवघ्या 6 लाखात येणाऱ्या एका भन्नाट आणि सर्वात भारी एसयूव्ही कारबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.
या कारमध्ये तुम्हाला बेस्ट फीचर्ससह उत्तम मायलेज आणि स्टायलिश लुक देखील पाहायला मिळतो. चला मग जाणून घ्या या 6 लाखात येणाऱ्या दमदार एसयूव्ही कारबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या कारचं नाव Nissan Magnite आहे. सध्या ही कार बाजारात धुमाकूळ घालत इतर सर्व कार्सना टक्कर देत आहे. कंपनीने या कारमध्ये 999 cc चे पेट्रोल इंजिन दिले आहे जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो 999 सीसी इंजिन 6250 आरपीएमवर 71.02 बीएचपी पॉवर आणि 3500 आरपीएमवर 96 एनएम टॉर्क निर्माण करते. या मॉडेलमध्ये 18.75 kmpl चे प्रमाणित मायलेज दिसत आहे.
Nissan Magnite फीचर्स
कंपनीने या कारमध्ये बेस्ट फीचर्सही दिले आहेत. यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, वॉशरसह रिअल डिफॉगर, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि मागील आणि समोर पॉवर विंडो यांसारखी अनेक फीचर्स आहेत. Nissan Magnite ला ASEAN NCAP कडून 4 स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे.
Nissan Magnite किंमत
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 8.84 लाख रुपये खर्च करावे लागतील.
म्हणूनच जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याचा विचार करत असाल, तर निसान इंडियाची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
हे पण वाचा :- Hyundai Creta Price : अप्रतिम फीचर्स , जबरदस्त मायलेजसह खरेदी करा Hyundai ची ‘ही’ भन्नाट SUV कार ; किंमत आहे फक्त ..