Norton V4CR : ‘या’ बाईकची किंमत इतकी की तुम्हाला फॉर्च्युनर खरेदी करता येणार; जाणून घ्या 1200 सीसी इंजिन बाईकची खासियत

Ahmednagarlive24 office
Published:

Norton V4CR : ऑटो बाजारात Norton ने आपली नवीन Norton V4CR बाईक लाँच करण्यात आली आहे. जी कंपनीच्या मागील मॉडेलवर म्हणजे V4SV वर आधारित असणार आहे. यात कंपनीकडून 1200 सीसी इंजिन देण्यात आले आहे.

जी आता बाजारातील इतर बाईक्सला कडवी टक्कर देईल. जर किमतीचा विचार केला तर या बाईकची किंमत 42.81 लाख रुपये इतकी आहे. या किमतीत तुम्ही सहज फॉर्च्युनर खरेदी करू शकाल. दरम्यान कंपनीकडून यात शक्तिशाली फीचर्स देण्यात आली आहेत.

नवीन मोटारसायकल ब्रिटीश बाजारपेठेत लॉन्च केली असून ती कंपनीच्या मागील मॉडेल V4SV वर आधारित आहे. यामध्ये कंपनीने हाताने बनवलेली अॅल्युमिनियम फ्रेम, एलईडी हेडलाईट, टायटॅनियम एक्झिट सिस्टम आणि 15-लिटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. ही एक कॅफे रेसर बाईक असून जिला मस्क्युलर डिझाइन दिले आहे. सिंगल पीस सीट, रुंद टायर, खालच्या बाजूने उतार असणारा हँडलबार बाइकला आकर्षक लुक देत आहे.

Norton V4CR मध्ये कंपनीकडून 1200cc V4 इंजिन वापरण्यात आले आहे, जे 185bhp पॉवर आणि 125Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. भारतीय बाजारात विकल्या गेलेल्या Tata Safari आणि Mahindra Scorpio-N सारख्या SUV वाहनांचे इंजिन 167Bhp ते 172Bhp पर्यंतचे पॉवर आउटपुट दिले आहे.

समोरील बाजूने शॉर्ट बॉडी आणि कॉम्पॅक्ट टेल युनिटसह, V4CR ला आक्रमक स्वरूप देईल. ही बाईक सोलिहुल मुख्यालयात तयार केली आहे. ती पूर्णपणे हाताने तयार केली आहे. त्यामुळे त्याचे युनिट्स मर्यादित ठेवले आहे. Norton V4CR ला लीन-एंगल सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि तीन इंजिन मोड, कीलेस इग्निशन आणि 6-इंचाचा TFT डिस्प्ले दिला जात आहे.

यात हाताने बनवलेली एक्झॉस्ट सिस्टीम आणि V4 इंजिनचे संयोजन बाईकला आकर्षक आवाज देत असल्याचे कंपनीचे मत आहे. V4CR हे कंपनीने केलेले पहिले पूर्णपणे नवीन मॉडेल असून कंपनीच्या अभियांत्रिकी आणि डिझाइन संघांनी ही बाईक तयार करण्यासाठी सुरुवातीच्या स्केचेसपासून ते संकल्पना आणि उत्पादन तयार करण्यापर्यंत, अंतिम टच पूर्ण करण्यासाठी सर्व काही इन-हाउस करण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षपासून या बाईकवर काम सुरु होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe