Ola Discount Offers : स्वप्न होणार पूर्ण ! आता बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार ओला इलेक्ट्रिक स्कूटर ; मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे

Ola Discount Offers : आज देशातील बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत कमालीची वाढ होताना दिसत आहे. लोक मोठ्या प्रमाणात आज इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सेंगमेंट सध्या ओला इलेक्ट्रिक स्कूटर राज्य करत आहे.

दमदार फीचर्स आणि उत्तम रेंजमुळे बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहे. यातच तुम्ही देखील ओलाची नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारात एक धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या Ola S1 आणि S1 Pro या दोन्ही मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

 

ऑफर

ओला इलेक्ट्रिककडून मिळालेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या खरेदीवर 4,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. कंपनी Ola S1 वर Rs 2,000 पर्यंत आणि S1 Pro वर Rs 4,000 पर्यंत सूट देत आहे. याशिवाय, कंपनी सब्सक्रिप्शन आणि एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर इतर फायदे देखील देत आहे. या सवलतीच्या ऑफर 12 मार्च 2023 पर्यंत वैध असतील. Ola आपल्या कम्युनिटी मेंबर्स Ola Care+ सबस्क्रिप्शन आणि सर्व एक्सपीरिएंस सेंटर्सवर एक्सटेंडेड वॉरंटीवर 50 टक्के सूट देखील देत आहे.

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर रेंज

OLA च्या इलेक्ट्रिक वाहन पोर्टफोलिओमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. कंपनीच्या बेस मॉडेल S1 Air ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये आहे, S1 च्या 2kW मॉडेलची किंमत 89,999 रुपये आणि 3kW व्हेरियंटची किंमत 1,07,999 रुपये आहे. तर S1 Pro ची किंमत 1,28,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या तिन्ही स्कूटर अनुक्रमे 101 किमी, 128 किमी आणि 170 किमीच्या खऱ्या रेंजसह येतात. जरी त्यांची ARAI प्रमाणित रेंज अधिक आहे, परंतु कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती देखील दिली आहे.

ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Ola S1 Air हे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. ही स्कूटर 2kW, 3kW आणि 4kW च्या तीन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह येते. जे अनुक्रमे 85Km, 125Km आणि 165Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही स्कूटर केवळ 3.8 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे. या स्कूटरची बॅटरी सामान्य घरगुती सॉकेटला जोडून पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. याला 34 लीटर क्षमतेची अंडरसीट स्टोरेज स्पेस मिळते.

हे पण वाचा :- Devendra Fadnavis : सरकारची मोठी घोषणा ! नवीन कार खरेदीवर मिळणार 25% सूट ; मात्र ठेवली ‘ही’ अट

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe