ओला कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात, ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार, नवीन किमती लगेच चेक करा, पहा…

Ola Electric Scooter Discount

Ola Electric Scooter Discount : तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्यांना ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर आता स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपये वाचवता येणार आहेत. कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर च्या खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मात्र ही डिस्काउंट ऑफर काही लिमिटेड टाईम पिरियड साठीच सुरू राहणार आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर चक्क 20,000 रुपयांची बचत करता येणार आहे.

कंपनी आपल्या पोर्टफोलिओमधील S1 Pro, S1 Air, S1 या सर्व मॉडेल्सवर डिस्काउंट देत आहे हे विशेष. ओला इलेक्ट्रिकने देऊ केलेल्या या डिस्काउंट ऑफरचा लाभ ग्राहकांना 17 जुलैपर्यंतच मिळणार आहे.

यानंतर ही डिस्काउंट ऑफर बंद केली जाणार आहे. म्हणजे ग्राहकांकडे आणखी चार दिवसांचा काळ शिल्लक आहे. जर तुम्हालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर येत्या चार दिवसात ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी लागणार आहे.

दरम्यान आता आपण ओला कंपनीकडून कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरवर किती रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कोणत्या स्कूटरवर किती रुपयांचा डिस्काउंट

कंपनी त्यांच्या S1 Air आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरवर 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर सवलत आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) सबसिडीचा लाभ मिळणार आहे.

S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.01 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, तुम्ही S1 Pro 1.29 लाख रुपयांना खरेदी करू शकता. कंपनी Ola S1 वर देखील बारा हजार पाचशे रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनी S1 व्हायब्रेशन S1 X+ वर सर्वात मोठी सूट देत आहे.

या ई-स्कूटरवर 20,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ही 85,000 रुपये एवढी आहे. मात्र या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर 17 जुलैपर्यंतचं वेळ मिळणार आहे. यानंतर ही ऑफर बंद केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe