OLA S1 Pro Scooter : जर तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये राज्य करत असणारी ओला स्कूटर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर घेऊन आली आहे.
ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर फ्रीमध्ये घरी आणू शकतात. होय, चक्क फ्रीमध्ये तुम्हाला सध्या बाजारात धुमाकूळ घालत असणारी OLA S1 Pro Scooter प्राप्त करण्याची सुवर्णसंधी आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Ola S1 Pro सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. उत्तम रेंज आणि भन्नाट फीचर्समुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही ही स्कूटर फ्रीमध्ये घरी कशी आणू शकतात.
आज भावीश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून Ola S1 Pro स्पेशल एडिशन मोफत देण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी ही स्कूटर कोणाला देणार आणि त्यासाठी काय करावे लागेल हे देखील सांगितले आहे. तुम्हालाही ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या घरी मोफत आणायची असेल तर ही बातमी नक्की वाचा.
बक्षीस कसे मिळवायचे?
भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून लिहिले की, मी पेट्रोल वाहनावर काही मजेदार आयसी आणि मीम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुमच्याकडे असेल तर कृपया शेअर करा, ज्याचा मीम दिवसातील सर्वोत्तम असेल त्याला OLA S1 Pro स्पेशल एडिशन बक्षीस म्हणून दिले जाईल. यापूर्वी होळीच्या वेळी बक्षीस म्हणून स्कूटर दिली जात होती.
भाविश अग्रवाल त्यांच्या ट्विटर हँडलवरून ओला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून देत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी होळीच्या वेळीही त्यांनी अशीच ऑफर दिली होती. त्यावेळी ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ट्विट केले की, लोकप्रिय मागणीमुळे आम्ही यापैकी 5 स्पेशल होळी एडिशन बनवणार आहोत. तुम्ही तुमच्या S1 सोबत होळी कशी साजरी केली याच्या फोटो /व्हिडिओसह कमेंट करा आणि टॉप 5 विजेत्यांना होळी एडिशन बक्षीस दिले जाईल.