Ola Electric Scooter Offer : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार याची भारतात मोठी मागणी आहे. चांगल्या रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटर सर्वसामान्यांमध्ये अलीकडे लोकप्रिय बनल्या आहेत.
दरम्यान इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता पाहता आता वेगवेगळ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. Ola, Ather, TVS, Simple Energy इत्यादी कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ओला कंपनीने 2023 मध्ये देखील काही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे.
Ola ही एक प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी म्हणून उदयास आली आहे. दरम्यान ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणीवर वर्षाच्या शेवटी बंपर सवलत जाहीर केली आहे.
ओला कंपनीने S1 X + या आपल्या लोकप्रिय स्कूटरवर इयर एन्ड ऑफर जाहीर केली आहे. या स्कूटरवर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 20 हजार रुपयाचा डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. सध्या ही इलेक्ट्रिक स्कूटर 89 हजार 999 रुपये एवढ्या एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.
मात्र या गाडीची मूळ एक्स शोरूम किंमत ही एक लाख 9 हजार 999 एवढी आहे. अर्थातच या स्कूटरवर कंपनीच्या माध्यमातून 20 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र ही ऑफर किंवा सवलत आगामी तीन दिवसच राहणार आहे. म्हणजेच ही ऑफर 31 डिसेंबर 2023 पर्यंतच राहणार आहे.
यानंतर पुन्हा एकदा ग्राहकांना या स्कूटरची मूळ किमतीत खरेदी करावी लागणार आहे. यामुळे ज्या लोकांना स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर हवा असेल त्यांनी लवकरात लवकर या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी केली पाहिजे. निश्चितच ज्या लोकांना नवीन वर्षात नवी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल त्या लोकांनी 31 डिसेंबर पर्यंत या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी केली तर त्यांचे हजारो रुपये सेव होणार आहेत.