Petrol Car Under 10 Lakh : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. मात्र असे असले तरी आजही भारतीय कार बाजारात पेट्रोल गाड्यांची मोठी मागणी आहे यात शंकाच नाही. भारतीय कार बाजार बाबत बोलायचं झालं तर येथे पेट्रोल वाहनांचे एक वेगळेचं वर्चस्व आहे. ग्रामीण असो किंवा शहरी भाग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पेट्रोल कार पाहायाला मिळतील.
खरंतर, बाजारात इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहने देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत आणि ही वाहने पेट्रोल वाहनांप्रमाणे उत्कृष्ट देखील आहेत. मात्र सीएनजी वाहनांच्या तुलनेत पेट्रोल वाहने जास्त पिकअप आणि मजबूत पॉवर देतात.
यामुळे आजही अनेक लोक पेट्रोल वाहने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. भारतीय कार बाजारात विविध कार उत्पादक कंपन्या एंट्री लेव्हल, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी एक्स-शोरूममध्ये अनेक वाहने ऑफर करत आहेत.
दरम्यान आज आपण यापैकी दोनगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत. Hyundai i20, आणि Tata Nexon या दोन लोकप्रिय कार्सची आज आपण माहिती पाहणार आहोत.
Tata Nexon : टाटा ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटा नेक्सॉन. या कारचे बेस मॉडेल 7.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध करून दिले जात आहे.
कंपनीच्या या दमदार कारमध्ये 1497 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. उच्च पिकअपसाठी, ही कार 120hp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात 10.25-इंचाची टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे, जी या गाडीचा लुक वाढवते.
या कंपनीच्या लोकप्रियकारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुद्धा या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.
Hyundai i20 : ह्युंदाई ही देखील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी असून याही कंपनीच्या अनेक गाड्या भारतीय बाजारात विकल्या जात आहेत. ही कार देखील दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत भारतीय बाजारात उपलब्ध होते.
या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही कार इंडियन कार मार्केटमध्ये 7.04 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून दिली जात आहे. या गाडीच्या टॉप मॉडेलची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 14.05 लाख रुपये एवढी ऑन-रोड प्राईस आहे.
या शक्तिशाली कारमध्ये सुरक्षिततेसाठी ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) देण्यात आली आहे. जेव्हा अपघाताचा धोका असतो तेव्हा ही यंत्रणा ड्रायव्हरला अलर्ट जारी करते. या स्टायलिश कारला 16 इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत, जे तिचा लुक वाढवतात. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते.