पेट्रोल कार खरेदी करताय ? ‘या’ आहेत 6 लाखाच्या आत उपलब्ध होणाऱ्या टॉप 3 कार ; यादीत टाटाच्या कारचाही समावेश

Petrol Car Under 6 Lakh : प्रत्येकाचे आपल्याकडेही एक कार असावी असे स्वप्न असते. मात्र मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांसाठी कार खरेदी करणे सोपे नाही. दिवसेंदिवस गाड्यांच्या किमती वाढत आहेत आणि यामुळे इच्छा असतानाही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचे कार खरेदीचे स्वप्न आर्थिक कारणांमुळे पूर्ण होत नाही.

दरम्यान मध्यमवर्गीयांची हीच अडचण लक्षात अनेक ऑटो मेकर कंपन्यांनी काही बजेट फ्रेंडली कार तयार केलेल्या आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश होतो.

दरम्यान आज आपण सहा लाखांच्या आत उपलब्ध होणाऱ्या टॉप 3 पेट्रोल कार ची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही नजीकच्या भविष्यात पेट्रोल गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

सहा लाखाच्या आत उपलब्ध होणाऱ्या टॉप 3 पेट्रोल कार

1) Tata Tiago : टाटा समूहाची टाटा मोटर्स ही उप कंपनी एक प्रमुख वाहन निर्माता कंपनी आहे. ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय ऑटो कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीची टाटा टियागो ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

ही कंपनीची एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. या गाडीची किंमत ही सहा लाखाच्या आतच आहे. 5.54 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होणारी ही गाडी तब्बल 24.35 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

2) Maruti Suzuki WagonR : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ही गाडी सर्वात जास्त कार उत्पादित करणारी कंपनी अनेक बजेट फ्रेंडली कार ऑफर करत आहे. मारुती सुझुकी वॅगनर ही देखील अशीच एक बजेट फ्रेंडली कार आहे.

ही गाडी मध्यमवर्गीय कुटुंबात खूपच लोकप्रिय आहे. या गाडीची किंमत अवघी ५.५४ लाख रुपये एवढी आहे. मात्र ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे. मायलेज बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 24.35 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

Renault Kwid : रेनॉल्ट कंपनीची क्विड ही गाडी कंपनीची एक इंट्री लेवल कार आहे. या गाडीची किंमत ही पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे विशेष. ही गाडी 4.69 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात उपलब्ध आहे.

मात्र ही या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत आहे. या गाडीचे मायलेज देखील खूपच उत्तम आहे. ही कार 21.7 किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.