Renault Cheapest 7 Seater Car : ह्युंदाई Aura किंवा टाटा पंच नाही! तर ७ लाख रुपयांच्या कमी किमतीत येते Renault ची ही 7 सीटर कार, मिळतेय ५० हजारांची सूट

Ahmednagarlive24 office
Published:
Renault Cheapest 7 Seater Car

Renault Cheapest 7 Seater Car : तुम्हीही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर कार खरेदी करण्यासाठी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये Renault ची जबरदस्त फीचर्स असलेली कार उपलब्ध आहे. या कारची किंमत ७ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

कमी बजेट आणि मोठ्या कुटुंबासाठी Renault ची Triber कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्ही या जुलै महिन्यामध्ये ही कार खरेदी केली तर 50,000 रुपयांपर्यंत सूट तुम्हाला या कारवर दिली जात आहे.

कारमध्ये 999 cc चे पॉवरफुल इंजिन आणि 71 Bhp पॉवर

Renault Triber या ७ सीटर कारमध्ये जबरदस्त इंजिन देण्यात येत आहे. 999 cc चे पॉवरफुल इंजिनचा पर्याय या कारमध्ये देण्यात येत आहे. हे इंजिन 71.01 Bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Renault Triber या ७ सीटर कारमध्ये 84 लीटरची बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच कमी बजेट असणाऱ्यांसाठी Triber ही ७ सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.33 रुपयांपासून सुरुवात होते तर टॉप व्हेरियंट 8.97 लाख रुपयांच्या आसपास जाते. ही कार 20 kmpl पर्यंत उच्च मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

5000 रुपयांची रोख सवलत आणि 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनस

जर तुम्ही Renault Triber ही कार ३१ जुलैपर्यंत खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 52,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या कारवर 15,000 रुपयांची रोख सूट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 12,000 रुपयांची लॉयल्टी सूट दिली जात आहे.

Renault Triber कार देते या कारला टक्कर

Renault Triber ही ७ सीटर कार Hyundai Aura, Tata Punch, Maruti Suzuki Swift, Citroen C3 आणि Toyota Glanza या कारला टक्कर देते. या कारमध्ये सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल स्टार्ट असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Renault Triber 8 प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे

Renault Triber 8 मॉडेलमध्ये भारतीय ऑटो बाजारात सादर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडीनुसार या कारचे मॉडेल खरेदी करू शकतात. या कारचा ग्राउंड क्लीयरन्स 182mm आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये ही कार उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe