Renault Triber Facelift : मोठ्या कुटुंबासाठी 7-सीटर कार घेण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात, मात्र बजेट आडवं येतं. जर तुम्हीही कमी किमतीत, दमदार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स असलेली कार शोधत असाल, तर Renault Triber Facelift तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही कार सध्या बाजारातील सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही म्हणून ओळखली जाते आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.
Renault Triber Facelift ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत केवळ 5.76 लाख रुपये इतकी आहे. एवढ्या कमी किमतीत 7 प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा देणारी दुसरी कार सध्या क्वचितच पाहायला मिळते. Triber ही कार खास भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली असून, दैनंदिन वापरासोबतच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ती उपयुक्त ठरते.

इंजिनबाबत बोलायचं झालं तर, नव्या Triber Facelift मध्ये आधीप्रमाणेच 1.0 लिटर, 3-सिलेंडर नॅचरलि ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. गाडीमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT (ऑटोमॅटिक) असे दोन्ही ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवड करता येते.
कमी खर्चात चालणाऱ्या कारची गरज असणाऱ्यांसाठी Renault कडून CNG रेट्रोफिटमेंटचा पर्याय देखील देण्यात आला आहे. हा CNG किट थेट अधिकृत डीलरशिपवर बसवून मिळतो. मात्र, यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो आणि कंपनीकडून या किटवर 3 वर्षांची वॉरंटी दिली जाते.
सेफ्टीच्या बाबतीत Renault Triber Facelift कोणतीही तडजोड करत नाही. या कारमध्ये 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आल्या आहेत, जे या सेगमेंटमधील एक मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. मजबूत बिल्ड क्वालिटी, आवश्यक सेफ्टी फीचर्स आणि कुटुंबासाठी उपयुक्त इंटीरियर यामुळे ही कार सुरक्षिततेचा विश्वास देते.
एकूणच, कमी बजेटमध्ये 7-सीटर, चांगली सेफ्टी, आधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँड हवा असेल, तर Renault Triber Facelift ही मोठ्या कुटुंबासाठी एक परफेक्ट आणि किफायतशीर निवड ठरू शकते.













