Royal Enfield Upcoming Bike : भारतात बुलेट प्रेमींची संख्या खूपच अधिक आहे. Royal Enfield कंपनीची बुलेट ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दरम्यान, जर तुम्हालाही रॉयल इन्फिल्डची बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आगामी काळात दोन नवीन बाईक लॉन्च करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला रॉयल इन्फिल्डची बाईक खरेदी करायची असेल तर आतापासूनच पैसे जमवावे लागणार आहेत.
रॉयल एनफिल्ड ही देशातील एक प्रमुख टू व्हीलर निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. ग्रामीण भाग असो की शहरी भाग सर्वत्र रॉयल इन्फिल्डच्या गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील.
दरम्यान, आता कंपनी आपला पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग करणार आहे. नजीकच्या भविष्यात रॉयल एनफिल्ड दोन नवीन बाईक लॉन्च करणार असून आज आपण याच दोन बाईक संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
Royal Enfield Classic 350 Updated : Royal Enfield Classic 350 ही कंपनीची सर्वात लोकप्रिय मोटरसायकल आहे. Bullet 350 प्रमाणेच क्लासिक 350 ची देखील भारतीय बाजारात मोठी मागणी असते.
ग्रामीण भागातही ही गाडी मागणीमध्ये आहे. या गाडीची हीच लोकप्रियता पाहता आता कंपनी लवकरच याचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंपनी येत्या 2 महिन्यांत अपडेटेड Royal Enfield Classic 350 लॉन्च करणार आहे. मात्र, या अपडेटेड व्हर्जनच्या मोटरसायकलच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही मूलभूत बदल होणार नाही असा दावा रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
Royal Enfield Goan Classic 350 : Royal Enfield Classic 350 चे अपडेटेड वर्जन तर लॉन्च करणारच आहे शिवाय आगामी काळात क्लासिक 350 चे सिंगल-सीट बॉबर प्रकार लॉन्च करण्याच्या तयारीत देखील आहे.
कंपनीच्या या आगामी मोटरसायकलचे नाव Royal Enfield Classic ‘Govan’ 350 असू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. रॉयल एनफिल्डची आगामी बॉबर मोटरसायकल 2024 च्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते असे बोलले जात आहे.