Samsung Smartphone Price: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सॅमसंगने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. कंपनीने नववर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या काही लोकप्रिय मॉडेलच्या किमती वाढवल्या आहेत आणि हे नवीन दर आजपासून अर्थात 5 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. कंपनीने आजपासून त्यांच्या गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एफ सीरीजच्या काही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. सॅमसंगने गॅलेक्सी ए56, ए36 आणि एफ17 च्या सर्व व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे ज्या ग्राहकांना सॅमसंगचे हे मॉडेल्स खरेदी करायची असतील त्यांना अधिकचा खर्च करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण सॅमसंग ने कोणत्या मॉडेलची किंमत कितीने वाढवली आहे याचा आढावा येथे घेणार आहोत.
Galaxy A56 किमती : गॅलेक्सी A56 च्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत (12 जीबी+256 जीबी) 44,999 वरून 46,999 झाली आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41999 वरून 43,999 रुपये झाली आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 38999 वरून 40,999 रुपये झाली आहे. म्हणजेच या मॉडेलच्या सर्व व्हेरिएंट ची किंमत दोन हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Galaxy A36 : सॅमसंगच्या या हँडसेटच्या सर्व व्हेरिएंट ची किंमत पंधराशे रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यानुसार 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,499 वरून 36,999 झाली आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट आता 33,999 वरून 35,499 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटची किंमत आता 30,999 वरून 32,499 रुपये झाली आहे.
Galaxy F17 : सॅमसंगच्या या मॉडेलच्या सर्व व्हेरिएंटच्या किमती 1000 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. या मॉडेलचे 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 14,499 वरून 15,499 झाली आहे. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 18499 रुपये झाली आहे.












