Volkswagen Virtus Offers : जर तुम्ही जुलै महिन्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर सध्या फोक्सवॅगनवर मोठी सूट दिली जात आहे, उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही कार तुम्ही चांगल्या सवलतीत खरेदी करू शकता.
जर्मन कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने या कारवार मान्सून ऑफर लागू केली आहे. या सवलतीअंतर्गत ग्राहकांना फोक्सवॅगनच्या तीन मॉडेल टिगुन, व्हरटस आणि टिगुआनच्या खरेदीवर लाखो रुपयांच्या सवलतीचा लाभ मिळत आहे.
वाहन उत्पादक कंपनी Volkswagen कडून जुलै महिन्यात ऑफर करण्यात येत असलेल्या डिस्काउंट ऑफरशी संबंधित सविस्तर बोलायचे तर, Volkswagen Tiguan 5-सीटर SUV ची किंमत 35.17 लाख रुपये आहे. कंपनी तिच्या 2023 मॉडेलवर एकूण 3.40 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर त्याच्या 2024 मॉडेलवर ही सूट 1.25 लाख रुपयांपर्यंत कमी झाली आहे.
सवलत ऑफर अंतर्गत, Volkswagen Virtus 2024 च्या निवडक 1.0-लीटर TSI प्रकारांना या महिन्यात 1.45 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. एंट्री-लेव्हल कम्फर्टलाइन एमटी 10.90 लाख (एक्स-शोरूम) च्या विशेष किमतीत ऑफर केली जात आहे. त्याच वेळी, Taigun आणि Virtus च्या 2 एअरबॅगसह सुसज्ज असलेल्या मॉडेल्सना 40,000 रुपयांच्या अतिरिक्त रोख सवलतीचा लाभ मिळत आहे, याशिवाय Virtus 1.5-litre TSI च्या निवडक प्रकारांवर 70,000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Volkswagen Taigun भारतीय बाजारात 10.90 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकली जाते. त्याच वेळी, फॉक्सवॅगन तैगनवर 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. सवलत ऑफर अंतर्गत, त्याचे 2023 मॉडेल GT 1.5 TSI MT Chrome वर एकूण 50,000 रुपयांच्या सवलतीसह 14.99 लाख रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध आहे. तर 1.0-लीटर TSI 2024 मॉडेलवर 1.30 लाख रुपये आणि 1.5-लीटर TSI मॉडेलवर 1 लाख रुपयांची बचत होईल. याव्यतिरिक्त, 1.0-लीटर TSI MT Comfortline प्रकाराची किंमत 10.90 लाख रुपये आहे. त्यावर 40,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.