SUV चा ‘बाप’ स्कॉर्पिओ ! पण आता खरेदीसाठी 2 महिने वाट पाहावी लागणार

Published on -

महिंद्रा स्कॉर्पिओ ही भारतातील SUV सेगमेंटमध्ये ‘बिग डॅडी’ म्हणून ओळखली जाते.शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत आणि प्रभावशाली लोकांमध्ये तिची जबरदस्त लोकप्रियता आहे.मात्र, Mahindra Scorpio N आणि Scorpio Classic खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आली आहे – या दोन्ही SUV चा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे.

महिंद्राने अलीकडेच Scorpio N आणि Scorpio Classic चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले, आणि ग्राहकांकडून या SUV ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच, कंपनी सध्या उत्पादन क्षमतेनुसार पुरवठा करत असून, त्याचा परिणाम वेटिंग पिरियडवर झाला आहे.आता ग्राहकांना त्यांच्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी किमान 1-2 महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रतीक्षा कालावधी किती ?

कंपनीने Mahindra Scorpio N आणि Scorpio Classic च्या विविध मॉडेल्ससाठी वेटिंग पिरियड जाहीर केला आहे. हा कालावधी SUV च्या विविध व्हेरिएंट्सनुसार बदलतो.Mahindra Scorpio N Z2 (पेट्रोल/डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन) – 1 महिना प्रतीक्षा कालावधी, Mahindra Scorpio N Z4 (सर्व प्रकारांसाठी) – 1 महिना प्रतीक्षा कालावधी, Mahindra Scorpio N Z6 (डिझेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) – 1 महिना प्रतीक्षा कालावधी,

Mahindra Scorpio N Z8 सिलेक्ट (सर्व ट्रान्समिशन मॉडेल्स) – 2 महिने प्रतीक्षा कालावधी, Mahindra Scorpio N Z8 आणि Z8L (सर्व प्रकारांसाठी) – 1 महिना प्रतीक्षा कालावधी, याशिवाय, Mahindra Scorpio Classic च्या दोन्ही प्रकारांसाठी (S आणि S11) देखील 30 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.याचा अर्थ असा की, Scorpio N च्या टॉप व्हेरिएंटसाठी वेटिंग पिरियड जास्त असून, ग्राहकांना 2 महिने वाट पाहावी लागू शकते.

वेटिंग पिरियड वाढण्यामागचे कारण काय ?

महिंद्रा स्कॉर्पिओ ही SUV भारतीय ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे,आणि मागील काही वर्षांत तिची मागणी प्रचंड वाढली आहे.विशेषतः Scorpio N आणि Classic चे अपडेटेड व्हर्जन्स आल्यापासून ग्राहकांमध्ये उत्साह वाढला आहे.SUV च्या प्रतीक्षा कालावधी वाढण्यामागील कारणे म्हणजे

जबरदस्त मागणी: Scorpio N आणि Classic ला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे, आणि कंपनीला ती वेळेत पूर्ण करणे कठीण जात आहे.
पुरवठा साखळीतील अडचणी: ग्लोबल सप्लाय चेनमध्ये काही अडथळे आल्याने उत्पादन गती मंदावली आहे.
SUV सेगमेंटमधील वाढ: भारतात SUV ची मागणी प्रचंड वाढली असून, ग्राहक हॅचबॅक किंवा सेडानऐवजी SUV खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
महिंद्राने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना SUV ची डिलिव्हरी घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe