Simple Dot One e-scooter : भारतात लॉन्च झाली 150 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर ! किंमत आहे खूपच कमी…

Published on -

Simple Dot One e-scooter : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बाजारात आता इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात लॉन्च केले आहे.

भारतीय बाजारात विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च झाल्या आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार Simple Energy या कंपनीने भारतीय बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.

विशेष म्हणजे कंपनीने नव्याने लॉन्च केलेली ही स्कूटर तब्बल दीडशे किलोमीटर पेक्षा जास्तीची रेंज देणारी आहे. म्हणजेच एकदा ही स्कूटर चार्ज केली की दीडशे किलोमीटर पर्यंत धावू शकणार आहे. या कंपनीने Simple Dot One ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

विशेष म्हणजे या स्कूटर ची किंमत एक लाखापेक्षा कमी आहे. खरे तर भारतीय बाजारात प्रीमियम सेगमेंटच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही दिड लाखाच्या आसपास आहे. मात्र या नव्याने लाँच झालेल्या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

पण या किमतीत प्रत्येकालाच ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करता येणार नाही. ज्या ग्राहकांनी या स्कूटरची प्री-बुकिंग केलेली असेल त्यांनाच याचा फायदा घेता येणार आहे. अर्थातच ज्या लोकांनी या इलेक्ट्रिक स्कूटरची प्री बुकिंग केलेली असेल त्यांनाच एक लाखात ही स्कूटर मिळणार आहे.

पण ज्या लोकांनी प्री बुकिंग केलेली नसेल त्यांना कंपनी जानेवारी 2024 मध्ये ज्या नवीन किंमती जाहीर करेल त्या किंमतीत ही गाडी खरेदी करता येणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची लॉन्चिंग केली आहे आणि यासाठी प्री बुकिंग देखील सुरु झाली आहे.

ही गाडी सिंगल वॅरिएंट मध्ये लाँच झाली आहे. पण भविष्यात या गाडीचे दुसरे वॅरिएंट देखील येणार आहेत. आता आपण या गाडीची प्री बुकिंग कुठे करता येणार आणि या गाडीचे फिचर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कुठं बुक करणार
जर तुम्हालाही ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सवलतीच्या दरात खरेदी करायची असेल तर तुम्हाला यासाठी प्री बुकिंग करावे लागणार आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या स्कूटरची प्री बुकिंग करू शकता. दरम्यान कंपनीने सर्वप्रथम ही स्कूटर बेंगलोर शहरात डिलिव्हरी साठी उपलब्ध होईल आणि त्यानंतर हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये ही स्कूटर दाखल होईल अशी माहिती दिली आहे.

Simple Dot One स्कूटरचे फिचर्स
सिंगल वॅरीयंट मध्ये लॉन्च झालेली ही स्कूटर नम्मा रेड, ब्रेझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट आणि अझर ब्लू या चार कलर मध्ये उपलब्ध आहे. तुम्ही यापैकी तुमचा आवडीचा कलर सिलेक्ट करून या स्कूटरची खरेदी करू शकणार आहात. ही गाडी 750W चार्जरसह येते. एकदा स्कूटर फुल चार्ज केली की ती 151 किलोमीटर पर्यंत चालू शकते.

अर्थातच या इलेक्ट्रिक स्कूटर ची रेंज चांगली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर मात्र दोन पॉईंट सात सेकंद मध्ये झिरो ते 40 किलोमीटर प्रति तास चा वेग पकडणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ट्यूबलेस टायर दिले गेले आहेत. या ई-स्कूटरला 12-इंचचे चाक देण्यात आले आहे.

या स्कूटरमध्ये टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट पॅनल, CBS, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आणि 35-लिटर अंडर-सीट स्टोरेज देण्यात आले आहे. खरे तर कंपनीने याआधी देखील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत मात्र नुकतीच लॉन्च झालेली ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आधीच्या इलेक्ट्रिक स्कूटर पेक्षा स्वस्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!