Skoda Kylaq :- स्कोडाने आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kylaq बाजारात सादर करताच या कारला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 7.89 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या SUV ने पहिल्या 10 दिवसांत तब्बल 10,000 बुकिंग्स मिळवल्या आहेत. किफायतशीर किंमत, प्रीमियम लुक, दमदार फीचर्स आणि उत्तम मायलेज यामुळे ही कार भारतीय ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहे.
स्कोडाची सर्वात स्वस्त SUV
स्कोडाने आतापर्यंत बाजारात सादर केलेल्या SUV च्या तुलनेत क्यलॅक ही सर्वात परवडणारी SUV आहे. किफायतशीर किमतीत उत्कृष्ट फीचर्स देणारी ही गाडी थेट मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किआ सोनेट सारख्या लोकप्रिय SUV मॉडेल्सना जोरदार टक्कर देत आहे.
वेटिंग पीरियड : 27 जानेवारीपासून स्कोडाने क्यलॅकच्या डिलिव्हरीस सुरुवात केली असून सध्या याची वेटिंग पीरियड 6 ते 8 आठवडे आहे. विविध प्रकारांनुसार हा कालावधी बदलू शकतो.
स्कोडा क्यलॅक इंजिन : इंजिन: 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून 115 BHP पावर जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच 6 -स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स देण्यात आला आहे. ०-१०० km/h वेग मिळवण्यासाठी फक्त 10.5 सेकंद लागतात व या कारचे अंदाजे मायलेज 20+ kmpl इतके आहे.
स्टायलिश डिझाईन : स्पोर्टी आणि प्रीमियम डिझाइन – आकर्षक LED DRLs आणि हेक्सागोनल फ्रंट ग्रिल शहरी आणि हायवे राईडसाठी योग्य असून कॉम्पॅक्ट पण आतून प्रशस्त केबिन देण्यात आली आहे.
टॉप फीचर्स : 10 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8 -इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पेन सनरूफ, मागील एसी व्हेंट्स आणि प्रीमियम केबिन, USB टाइप-C चार्जिंग पोर्ट्स इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.
सेफ्टी फीचर्स : 6 एअरबॅग्स – संपूर्ण संरक्षण, ABS आणि EBD, उत्कृष्ट ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम – सर्वोत्तम ग्रिप आणि स्थिरता, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम,सुरक्षित ड्रायव्हिंग इत्यादी चे फीचर्स आहेत.
किंमत : स्कोडा क्यलॅकची किंमत 7.89 लाख रुपये ते 14.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. विविध प्रकारांनुसार किंमतीत फरक असू शकतो.
स्कोडा क्यलॅक का खरेदी करावी?
SUV – 7.89 लाखांपासून सुरुवात,शानदार मायलेज आणि दमदार परफॉर्मन्स, प्रीमियम फीचर्स आणि उत्तम केबिन स्पेस आणि सर्वोत्तम सेफ्टी स्टँडर्ड्स इत्यादीमुळे ही कार फायद्याची ठरू शकते. जर तुम्ही एक स्टायलिश, सुरक्षित आणि फीचर-पॅक SUV शोधत असाल तर स्कोडा क्यलॅक तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. किंमत आणि वैशिष्ट्यांच्या तुलनेत ही गाडी भारतीय ग्राहकांसाठी योग्य आहे. पण बुकिंग करण्यापूर्वी वेटिंग पीरियड आणि तुमच्या गरजेनुसार योग्य व्हेरिएंट निवडण्याचा विचार नक्की करा.