भारतात फोक्सवॅगनच्या गाड्या त्यांच्या स्टायलिश डिझाइन, सेफ्टी फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. मात्र, विक्रीच्या बाबतीत कंपनीला फार मोठे यश मिळाले नाही.दरम्यान भारतीय SUV सेगमेंटमध्ये Skoda Kylaq ने जोरदार एंट्री केली असून, ग्राहकांकडून या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. Skoda च्या Slavia आणि Kushaq सारख्या गाड्यांच्या विक्रीतही मोठी वाढ दिसून आली आहे. त्याच वेळी, फोक्सवॅगनच्या कार विक्रीत केवळ 2% वाढ झाली असून, विशेषतः Volkswagen Virtus ची मागणी घटली आहे. Skoda च्या तुलनेत फोक्सवॅगनच्या विक्रीत मोठी वाढ दिसून न आल्याने बाजारात Skoda ची पकड मजबूत होत आहे.
गेल्या महिन्यात Volkswagen Virtus ची विक्री 1795 युनिट्स झाली असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 4% नी कमी आहे. दुसरीकडे, Volkswagen Taigun ची विक्री मात्र चांगली झाली असून 1548 युनिट्स विकले गेले, ज्यामुळे 21% ची वाढ झाली. मात्र, Volkswagen Tiguan साठी मोठी घसरण झाली आहे. जानेवारी महिन्यात फक्त 1 युनिट विकले गेले, म्हणजेच 99% घट झाली. फोक्सवॅगनने जानेवारी 2025 मध्ये एकूण 3344 वाहने विकली, जे Skoda च्या तुलनेत कमी आहे.

Skoda च्या विक्रीत मोठी झेप
Skoda ने या वेळी फोक्सवॅगनच्या तुलनेत खूपच चांगली कामगिरी केली आहे. 2025 च्या जानेवारी महिन्यात Skoda च्या विक्रीत तब्बल 74% वाढ झाली आहे. Skoda च्या सर्व गाड्यांनी विक्रीत चांगली वाढ नोंदवली आहे. Skoda Slavia ने 1510 युनिट्स विकले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 22% अधिक आहे. Skoda Kushaq ची विक्री 1371 युनिट्स झाली असून, त्यात 27% ची वाढ दिसून आली आहे. Skoda Kylaq, जी अलीकडेच लाँच झाली आहे, तिची विक्रीही चांगली झाली असून 1242 युनिट्स विकले गेले. मात्र, Skoda Kodiaq ची मागणी तुलनेने कमी असून फक्त 10 युनिट्स विकले गेले. एकूणच, Skoda ने 4133 वाहने विकली, जी फोक्सवॅगनच्या तुलनेत जास्त आहेत आणि कंपनीच्या भारतीय बाजारपेठेतील लोकप्रियतेची जाणीव करून देतात.
Skoda Kylaq लुक आणि आकर्षक डिझाईन
Skoda Kylaq MQB-IN प्लॅटफॉर्म वर तयार करण्यात आली असून ही SUV 3.995 मीटर लांब आहे. या गाडीचा लुक Skoda Kushaq पासून प्रेरित आहे, पण त्यात आणखी स्टायलिश आणि स्पोर्टी डिझाईन पाहायला मिळते.Kylaq मध्ये 3D रिब्ससह मोठे ग्रिल, LED DRLs, क्रिस्टलाइन LED टेललॅम्प्स, स्पोर्टी बंपर, 17-इंच ब्लॅक-आउट अलॉय व्हील्स, तसेच 446 लिटर बूट स्पेस यांसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत. या स्टायलिश डिझाईनमुळे ही SUV ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
Skoda Kylaq चे फीचर्स
Skoda Kylaq मध्ये अनेक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट आहे. गाडीमध्ये सिंगल पॅन सनरूफ, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ऑटोमॅटिक एसी, आणि वायरलेस चार्जर सारखी सुविधाही देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, 6 एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल, EBD सह ABS, आणि 35 हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत. या सर्व सेफ्टी फीचर्समुळे ही SUV ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.
Skoda Kylaq – SUV मार्केटमध्ये मजबूत पकड
Skoda Kylaq भारतीय बाजारपेठेत जोरदार विक्री करत असून, ही SUV ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. तिचे आकर्षक डिझाईन, प्रगत फीचर्स आणि Skoda च्या मजबूत ब्रँड इमेजमुळे ती SUV सेगमेंटमध्ये एक उत्तम पर्याय ठरत आहे.Skoda Kylaq मुळे Kushaq आणि Slavia सारख्या गाड्यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे, तर फोक्सवॅगन Virtus सारख्या प्रतिस्पर्ध्यांना फटका बसत आहे. त्यामुळे येत्या काळात Skoda भारतीय बाजारपेठेत आणखी आघाडी घेताना दिसू शकते