Small Car : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून असंख्य निर्णय घेतले आहेत. शासनाचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले तर काही निर्णय यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी चा निर्णय देखील असाच एक वादग्रस्त निर्णय होता.
GST लागू झाली त्यावेळी अनेकांनी याला विरोध केला. पण आता सरकारने जीएसटी मध्ये मोठे संशोधन केले आहे. सरकारकडून जीएसटी 2.0 लागू करण्यात आली असून यामुळे अनेक वस्तूंवरील GST कमी झाला आहे.

तसेच काही अत्यावश्यक वस्तूंचा जीएसटी शून्य करण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे. छोट्या गाड्यांवरील जीएसटी देखील सरकारने कमी केला आहे. छोट्या कार्सवरील GST 18% झाला आहे. अर्थात यामध्ये दहा टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
यामुळे आता देशातील एंट्री-लेव्हल हॅचबॅक गाड्या अधिक किफायतशीर झाल्या आहेत. या निर्णयानंतर देशात वाहनांची विक्री वाढली आहे. हा निर्णय सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी मोठा किफायतशीर ठरतोय.
कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक गाड्या आता पाच लाखांच्या आत आले आहेत. दरम्यान आज आपण पाच लाखांच्या आतील काही छोट्या कार्सची माहिती पाहणार आहोत.
मॉडेल | किंमत (एक्स शोरूम) | मायलेज | फिचर्स |
Maruti WagonR | 4.99 लाख – 6.95 लाख | स्पेस आणि Comfort. सर्वाधिक विक्री होणारी हॅचबॅक. | |
Tata Tiago | 4.57 लाख – 7.82 लाख | 19-23 किलोमीटर / लिटर | NCAP रेटिंग 4 स्टार |
Renault Kwid | 4.30 लाख – 6 लाख | 21-22 किलोमीटर / प्रति लिटर | कंपनीची सर्वात स्वस्त SUV |
Maruti Alto K10 | 3.70 लाख – 5.45 लाख | 24.4 किलोमीटर / प्रति लिटर | अल्टो सीएनजी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. |
Maruti S-Presso | 3.50 लाख – 5.25 लाख | 24 KM / Liter | देशातील सर्वात स्वस्त कार. |