Strong Hybrid Cars : भारतातील ‘या’ 7 आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या शक्तिशाली हायब्रीड कार! पहा मायलेज आणि किंमत

Published on -

Strong Hybrid Cars : देशात प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या कार सध्या उपलब्ध झाल्या आहेत. भारतात अनेक कंपन्यांच्या हायब्रीड कार उपलब्ध झाल्या आहेत. तसेच ग्राहकांचा हायब्रीड कारला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

देशात टोयोटा कंपनी हायब्रीड कार सेगमेंटमध्ये 65% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह राज्य करत आहे. तसेच टोयोटा पाठोपाठ मारुती सुझुकी देखील त्यांच्या हायब्रीड कार बाजारात सादर करत आहे. तसेच अनेक हायब्रीड कारवर काम करत आहे.

टोयोटा कार निर्माता कंपनीचे हायब्रीड कार निर्मितीवर वर्चस्व असल्याचे दिसत आहे. तसेच यानंतर मारुती सुझुकी कंपनीच्या २ कार देखील हायब्रीड व्हर्जनमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. यानंतर होंडा कंपनीने देखील त्यांची हायब्रीड कार सादर केली आहे.

देशातील हायब्रीड कारच्या किमती देखील जास्त आहेत. तसेच अशा कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात येतात. चला तर जणू घेऊया गेल्या ३ महिन्यात भारतात कोणत्या हायब्रीड कारची विक्री किती आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटा कंपनीने हायब्रीड कारमध्ये चांगले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांची टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही कार हायब्रीड कारच्या विक्रीत अव्वल स्थानी आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये या कारचे 7073 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा ही हायब्रीड कार सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर आहे. या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये या कारची 3763 युनिट्स विकली गेली आहेत. तसेच या कारच्या हायब्रीड मॉडेलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 18.29 लाख पासून सुरू होते.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर

टोयोटा कंपनीची आणखी एक हायब्रीड कार सर्वाधिक विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या नंबरवर आहे. टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यात या कारची एकूण 2251 युनिट्स विकली गेली आहेत. या कारच्या हायब्रीड मॉडेलची किंमत 16.46 लाख रुपयांपासून सुरू होते.

Honda City EHEV

होंडा कंपनीची City EHEV ही स्ट्रॉन्ग हायब्रीड कार विक्रीच्या बाबतीत चौथ्या नंबरवर आहे. या कारची गेल्या तीन महिन्यामध्ये एकूण 569 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 18.89 लाख पासून सुरू होते.

Toyota Camry

टोयोटा कंपनीची Toyota Camry हायब्रीड कार सर्वाधिक विक्रीमध्ये पाचव्या नंबरवर आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये या कारची एकूण 389 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरवातीची एक्स शोरूम किंमत 46.17 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

मारुती सुझुकी कंपनीने टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित त्यांची इनव्हिक्टो कार जुलै २०२३ मध्ये सादर केली आहे. तसेच यामध्ये कंपनीकडून हायब्रीड कार देखील सादर करण्यात आली आहे. ही हायब्रीड कारच्या विक्रीत सहाव्या नंबरवर आहे. या कारची एकूण 203 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपयांपासून सुरू होते.

Toyota Vellfire

टोयोटा कंपनीची आणखी एक हायब्रीड कार Vellfire ही गेल्या तीन महिन्याच्या सर्वाधिक विक्रीत ७व्या नंबरवर आहे. गेल्या तीन महिन्यात या हायब्रीड कारची एकूण 151 युनिट्स विकली गेली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1.2 कोटी रुपयांपासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe