SUV Cars : भारतातील या शक्तीशाली SUV पेट्रोल/डिझेल इंजिनसह इलेक्ट्रिक अवतारात आहेत उपलब्ध! जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट कार

Ahmednagarlive24 office
Published:

SUV Cars : भारतात सध्या SUV कार खरेदी करण्यासाठी दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच देशांतर्गत SUV कार नागरिकांच्या बजेटमध्ये देखील उपलब्ध आहेत. कमी बजेट असणारे ग्राहक देखील कमी बजेटमधील SUV खरेदी करू शकतात.

देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांनी नवनवीन SUV कार पेट्रोल/डिझेलसह इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सध्या SUV कार खरेदीसाठी तीनही पर्याय उपलब्ध आहेत.

टाटा नेक्सॉन

मोटर्सकडून त्यांच्या अनेक SUV कार भारतीय ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. तसेच आता टाटा मोटर्सकडून पेट्रोल/डिझेल नंतर आता इलेक्ट्रिक सेगमेनमध्य देखील प्रवेश केला आहे. टाटा मोटर्सची सर्वाधिक विक्री होणारी Nexon कार पेट्रोल/डिझेल इंजिन पर्यायानंतर आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये देखील सादर झाली आहे.

तसेच लवकरच टाटा मोटर्सकडून नेक्सॉन कार सीएनजी पर्यायामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिल जाणार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.80 लाख रुपये आहे. या कारमध्ये पेट्रोल इंजिन 120 PS/170 Nm टॉर्क जनरेट करते तर डिझेल इंजिन 115 PS आणि 260 Nm टॉर्क निर्माण करते.

Tata Nexon EV

टाटा मोटर्सकडून त्यांची Nexon कार पेट्रोल/डिझेल इंजिन पर्यायानंतर आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये देखील सादर झाली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत 19.54 लाख रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार ३१२ किमीची रेंज देते.

महिंद्रा XUV300

महिंद्रा कंपनीची XUV300 दोन इंजिन पर्याय आणि इलेक्ट्रिक अवतारात देखील सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे हे इंजिन 130 PS/250 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. तर या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे हे इंजिन 117 PS/300 Nm पर्यंत टॉर्क निर्माण करते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आणि 14.60 लाख रुपयांपर्यंत जाते.

महिंद्रा XUV400

महिंद्रा कंपनीची आणखी एक शक्तिशाली SUV कार भारतीय ऑटो बाजारात उपलब्ध आहे. XUV400 या महिंद्राच्या SUV कारची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख ते 18.99 लाख रुपये आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक पर्याय देखील देण्यात आला आहे. या कारमध्ये 150 PS पॉवर आणि 310 Nm टॉर्क निर्माण करणारी इलेक्ट्रिक मोटार देण्यात आली आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 456 किमीची रेंज देऊ शकते.

एमजी अॅस्टर

एमजी कंपनीकडून त्यांची शक्तिशाली Astor SUV कार सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.82 लाख ते Rs 18.69 लाख रुपये आहे. या कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

MG ZS EV

एमजी Astor ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक कार भारतात सादर करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत 23.38 लाख रुपये आहे. ZS EV या इलेक्ट्रिक कारमध्ये 50.3 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये 461 किमीची रेंज देण्यात येते. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 177 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe