Syealion 6 Hybrid Car:- BYD ने इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये आपली नवीन सीलियन ६ हायब्रिड कार सादर केली असून ती लवकरच भारतीय बाजारात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच ही कार भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान पाहिली गेली असून तिचे फोटो समोर आल्यामुळे या वाहनाच्या संभाव्य लाँचिंगबाबत उत्सुकता वाढली आहे.
सीलियन ६ हा प्लग-इन हायब्रिड प्रकार असून यात DM-i AWD बॅजिंग आहे.जे BYD च्या अत्याधुनिक प्लग-इन हायब्रिड तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. या तंत्रज्ञानामुळे कारच्या कार्यक्षमतेत मोठी सुधारणा होते आणि मायलेज अधिक चांगले मिळते.
![byd sealion car](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zss.jpg)
किती देते रेंज?
कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर आणि इंधन भरल्यानंतर १००० किमी पर्यंत धावू शकते. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे १८.३ kWh क्षमतेची बॅटरी आणि इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) यांचा प्रभावी संगम असलेली हायब्रिड प्रणाली हे होय.या पॉवरट्रेनमुळे एकूण ३२० BHP पॉवर आणि ५५० Nm टॉर्क निर्माण होते.ज्यामुळे ही कार अतिशय जबरदस्त कामगिरी करू शकते.
कशी आहे बॅटरी क्षमता?
बॅटरी क्षमतेच्या दृष्टीने १८.३ kWh ब्लेड बॅटरी प्युअर EV मोडमध्ये ९२ किमी रेंज देते. तर ६०-लिटर इंधन टाकीमुळे एकूण रेंज १००० किमीपर्यंत जाते. BYD चा दावा आहे की ही कार १.४ लिटर / १०० किमीच्या इंधन वापर दराने चालते.
म्हणजेच अंदाजे ७१.४२ किमी प्रति लिटर मायलेज देते. जर हे आकडे प्रत्यक्ष वापरातही तंतोतंत ठरले. तर ही कार भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट मायलेज आणि प्रगत तंत्रज्ञानासह एक आदर्श हायब्रिड पर्याय ठरू शकते.
या कारमधील महत्त्वाचे फीचर्स
BYD सीलियन ६ मध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक वैशिष्ट्ये असतील. यामध्ये १५.६-इंच रोटेटेबल टचस्क्रीन, १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ३-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि अँबियंट लाइटिंग दिली जाण्याची शक्यता आहे. सुविधांसाठी गरम आणि हवेशीर फ्रंट सीट्स, ड्युअल वायरलेस चार्जर आणि पॅनोरॅमिक सनरूफसारखे पर्याय देखील उपलब्ध असतील.
सुरक्षा तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही कार कुठलीही तडजोड करणार नाही. यात ADAS (अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम), ३६०-डिग्री कॅमेरा आणि डिजिटल कीसारखी अत्याधुनिक फीचर्स असतील. संगीतप्रेमींसाठी इन्फिनिटी प्रीमियम ऑडिओ सिस्टम मिळण्याचीही शक्यता आहे.
भारतीय बाजारात ही हायब्रिड कार ग्राहकांसाठी मोठा बदल घडवून आणू शकते. BYD ची इलेक्ट्रिक आणि हायब्रिड तंत्रज्ञानात उत्तम पकड असल्याने सीलियन ६ ही जबरदस्त मायलेज, दमदार पॉवर आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह बाजारात एक प्रभावी पर्याय ठरू शकते. तिच्या लाँचिंगबाबत अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी भारतीय रस्त्यांवर सुरू असलेल्या चाचण्या पाहता ती लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे.