टाटाची Avinya X इलेक्ट्रिक कार बाजारामध्ये घालणार धुमाकूळ! कारप्रेमींसाठी ठरणार वरदान

tata avinya x electric car भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा नवे तंत्रज्ञान घेऊन बाजारात दमदार प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने अव्हिन्या एक्स कन्सेप्ट (Avinya X Concept) ही नव्याने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार सादर केली.

Ratnakar Ashok Patil
Published:

Tata Avinya X:- भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा नवे तंत्रज्ञान घेऊन बाजारात दमदार प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये टाटा मोटर्सने अव्हिन्या एक्स कन्सेप्ट (Avinya X Concept) ही नव्याने विकसित केलेली इलेक्ट्रिक कार सादर केली. या कारचे स्वरूप, तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये पाहून ग्राहक प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.

टाटाची नव्या युगाची इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सने आधीपासूनच पंच, टियागो, आणि नेक्सॉन यांसारख्या इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र अव्हिन्या एक्स कन्सेप्ट ही कार अधिक प्रगत,आधुनिक आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहन असणार आहे.

ही कार जेएलआरच्या ईएमए प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि यात 500 किमीहून अधिक रेंज असलेली बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे ही कार लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे. तसेच ADAS Level 2 सारखी अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीही यात देण्यात आली आहे.जी ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुरक्षित आणि आरामदायक करेल.

कारचे स्टायलिश इंटीरियर आणि डिझाइन

अव्हिन्याच्या इंटीरियरबद्दल फारशी माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र उपलब्ध झालेल्या फोटोंमधून तिचे डिझाइन स्पष्ट होते. कारच्या आतील भागात लाईट ग्रे आणि टेराकोटा ब्राउन ड्युअल टोन थीम वापरण्यात आली आहे. फ्रंट आणि रिअर सीटमध्ये वेगळेपण दर्शवणारी स्टायलिश रचना आहे.

याशिवाय या कारमध्ये टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे, जे रेंज रोव्हर सारख्या प्रीमियम कारमध्ये दिसते. तसेच, मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन डॅशबोर्डच्या मध्यभागी बसवण्यात आला आहे, तर स्लिम डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील उपलब्ध आहे.

टाटा अव्हिन्याची बाहेरील डिझाईन

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार अव्हिन्या म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक डिझाइनसह येणार आहे.ही एक SUV कन्सेप्ट असून ती खूपच शार्प आणि आकर्षक दिसते.

यामध्ये हाय ग्राउंड क्लीयरन्स, मस्क्युलर स्क्वेअर फ्रंट फेशिया, लो लाइंग हेडलॅम्प्स, आणि एक्स्टेंडेड टी-शेप लायटिंग सिग्नेचर देण्यात आले आहेत. कारच्या मागील बाजूला कूप-शैलीतील आकर्षक डिझाइन असून ब्लू आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये फिनिशिंग दिली आहे. यामुळे ही कार खूपच फ्युचरिस्टिक आणि मॉडर्न दिसते.

कार कधी होईल लॉन्च?

टाटा अव्हिन्या 2026 मध्ये अधिकृत लॉन्च होण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सने 2022 मध्ये या गाडीचा पहिला कन्सेप्ट सादर केला होता.मात्र आताच्या नव्या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक कारचा सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी कंपनीने विशेष प्रयत्न केले आहेत.

ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता

टाटा मोटर्सच्या या नव्या इलेक्ट्रिक कारबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अव्हिन्या ही नवीन तंत्रज्ञान उत्तम परफॉर्मन्स आणि भविष्यातील गरजांनुसार तयार करण्यात आलेली कार आहे.

भारतात इलेक्ट्रिक कार्ससाठी वाढता प्रतिसाद पाहता ही कार ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा 2026 च्या कडे आहेत.जिथे टाटा मोटर्स पुन्हा एकदा आपल्या नव्या इनोव्हेशनने भारतीय ऑटो उद्योगात इतिहास रचणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe