Tata ची भन्नाट ऑफर! ‘ह्या’ कार्सवर मिळत आहे तब्बल 48 हजारांची सूट; पहा संपूर्ण लिस्ट

Ahmednagarlive24 office
Published:

Tata Cars Discount :  जर तुम्ही तुमच्यासाठी लोकप्रिय कार कंपनी टाटा मोटर्सची या महिन्यात ( जून 2023) नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी टाटा मोटर्सने एक भन्नाट ऑफर जाहीर केला आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता टाटाची नवीन कार खरेदीवर तब्बल 48 हजारांची बचत करू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही टाटाच्या कोणत्या कार्सवर किती डिस्काउंट प्राप्त करू शकतात.

Tata Harrier आणि Safari ऑफर

टाटाच्या या दोन सर्वात भारी एसयूव्ही कारवर कंपनी बंपर सूट देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  हॅरियर आणि सफारी खरेदी करणाऱ्यांना या महिन्यात 35,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.दोन्ही SUV वर 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट तसेच 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

Tata Altroz ऑफर

कंपनीची प्रीमियम हॅचबॅक कार Tata Altroz वर सध्या एक भन्नाट ऑफर सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  Altroz च्या  सर्व पेट्रोल व्हेरियंटवर एकूण Rs 25,000 पर्यंत सूट मिळत आहे. त्याच वेळी, XE आणि XE+ व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. Altroz च्या डिझेल व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Tata Tiago ऑफर

टाटा मोटर्सच्या एंट्री-लेव्हल कार Tiago च्या पेट्रोल व्हेरियंटवर 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज डिस्काउंटसह, 20,000 रुपयांपर्यंतचे इतर फायदे उपलब्ध आहेत. त्याच वेळी, Tiago CNG वर 43,000 रुपयांपर्यंत कमाल सूट मिळू शकते.

Tata Tigor ऑफर

या महिन्यात ग्राहकांना Tata Tigor च्या पेट्रोल व्हेरियंटवर   एकूण 33,000 रुपयांपर्यंत आणि Tata Tigor च्या CNG व्हेरियंटवर   48,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. या सवलती कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

हे पण वाचा :-  तब्बल 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत! ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ, करिअरमध्ये मिळणार यश; वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe