Tata Cars Discount:- फेब्रुवारी महिन्यात टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. या महिन्यात टाटा हॅरियर आणि सफारीवर दिल्या जाणाऱ्या मोठ्या बचतीचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो.
कार डीलर्सकडे अद्याप 2024 मध्ये फेसलिफ्ट पूर्वीच्या हॅरियर आणि सफारीचा साठा शिल्लक आहे आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही हॅरियर किंवा सफारी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ऑफरचा फायदा घेणं तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते.
![tata safari and harrier](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/tata-harrier.jpg)
किती मिळत आहे सूट?
टाटा हॅरियर आणि सफारीच्या MY2024 मॉडेल्सवर एकूण 75000रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. यामध्ये 50000 रुपयांची रोख सूट आणि 25000 रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे. त्याचबरोबर MY2025 मॉडेल्सवर सुद्धा आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. या मॉडेल्सवर एकूण 50000 रुपयांची बचत करता येते.
ज्यात 25000 रुपयांची रोख सूट आणि 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. ह्या सवलतींमुळे ग्राहकांना अधिक आकर्षक किंमतीत या गाड्या खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
कसे आहे दोन्ही कारचे इंजिन?
इंजिनच्या बाबतीत टाटा हॅरियर आणि सफारी दोन्ही 2.0-लिटर, 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहेत.ज्यामुळे या गाड्या 170 हॉर्सपॉवर पॉवर आणि 350Nm टॉर्क निर्माण करतात. त्याच वेळी दोन्ही गाड्यांमध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे.
ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक आणि सोयीस्कर होतो. या गाड्यांमध्ये डिझाइन आणि इंजिनच्या बाबतीत उत्कृष्टता आहे. ज्यामुळे दोन्ही गाड्या एक उच्च दर्जाची एसयूव्ही म्हणून ओळखली जातात. हॅरियरची किंमत 14.99 लाख रुपयांपासून 25.89 लाख रुपयांपर्यंत आहे.
सफारीची किंमत 16.99 लाख रुपयांपासून 27.34 लाख रुपयांपर्यंत आहे.सार्वजनिक खरेदीसाठी हे मॉडेल्स अत्यंत आकर्षक आहेत. परंतु या महत्त्वाच्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही त्वरित निर्णय घ्यावा लागेल. कारण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
टाटा अल्ट्रोझवर किती मिळत आहे सूट?
याशिवाय टाटा अल्ट्रोजवर सुद्धा 1 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. अल्ट्रोजची एक्स-शोरूम किंमत 6.64 लाख रुपयांपासून सुरू होते. टाटा मोटर्सने विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक साफ करण्यासाठी विशेष सवलत दिली आहे.
या सवलतीत 85000 रुपयांची रोख सूट आणि 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे. टाटा अल्ट्रोज पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना विविध प्रकारांमध्ये कार खरेदी करण्याचा पर्याय मिळतो.
टाटा मोटर्सने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणि सवलती जाहीर केल्या आहेत. जेणेकरून त्यांनी या महिन्यात गाडी खरेदी करण्यासाठी निर्णय घेणं सोपं आणि परवडणं होईल. ही ऑफर एक मर्यादित कालावधीसाठीच आहे. त्यामुळे जर तुम्ही टाटा हॅरियर, सफारी किंवा अल्ट्रोज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घाई करा आणि या आकर्षक सवलतीचा लाभ घ्या.