Tata Curve Dark Edition:- भारतीय ऑटोमोबाईल बाजारात मोठी खळबळ माजवणाऱ्या टाटा कर्व्ह एसयूव्हीची डार्क एडिशन लवकरच सादर होणार आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या या लोकप्रिय कूप-एसयूव्हीच्या नवीन व्हेरिएंटवर काम सुरू केले आहे. विशेषतः याचे डिझाइन आणि फीचर्स बघता हा नवा अवतार ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
टाटा कर्व्हची लोकप्रियता

टाटा कर्व्ह भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली असून, ग्राहकांना तिचे इंजिन (ICE) आणि इलेक्ट्रिक दोन्ही व्हेरिएंट्स आवडत आहेत. विशेष म्हणजे हॅरियर आणि सफारीसारख्या मॉडेल्सच्या तुलनेत कर्व्हने विक्रीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कंपनी आता डार्क एडिशन बाजारात आणून ग्राहकांना आणखी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
कर्व्ह डार्क एडिशन कधी लाँच होणार?
टाटा मोटर्सने या गाडीच्या डार्क एडिशनवर काम सुरू केले असून या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. हे मॉडेल नेक्सॉन, अल्ट्रोज आणि हॅरियरच्या डार्क एडिशनप्रमाणे पूर्णतः काळ्या रंगाच्या इंटीरियर आणि एक्सटीरियर डिझाइनसह सादर केले जाईल. याशिवाय भविष्यात कंपनी कर्व्हच्या रेड डार्क एडिशन व्हेरिएंटवरही काम करत आहे.
एक्सटीरियर आणि इंटीरियर डिझाइन
टाटा कर्व्ह डार्क एडिशनमध्ये स्टायलिश आणि स्पोर्टी लुक असणार आहे. यामध्ये ग्लॉसी ब्लॅक ग्रिल, स्मोक्ड एलईडी हेडलॅम्प्स, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि संपूर्ण काळसर फिनिश असणार आहे.
इंटीरियरमध्येही पूर्णपणे काळ्या रंगाचा वापर केला जाईल. डॅशबोर्ड, स्टीअरिंग व्हील, सीट्स आणि दरवाज्यांचे पॅडिंग देखील ब्लॅक लेदर फिनिशमध्ये असतील. त्यामुळे ही एसयूव्ही अधिक प्रीमियम आणि लक्झरीयस भासेल.
शक्तिशाली इंजिन पर्याय
टाटा कर्व्ह डार्क एडिशनमध्ये दोन इंजिन पर्याय असतील. १.२-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन – १२५ एचपी पॉवर आणि २२५ एनएम टॉर्क निर्माण करणारे व दुसरे १.५-लिटर डिझेल इंजिन – ११७ बीएचपी पॉवर आणि २६० एनएम टॉर्क निर्माण करणारे असणार आहे व या दोन्ही इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील. त्यामुळे गाडी दमदार परफॉर्मन्स देईल.
आधुनिक सुरक्षितता फीचर्स
टाटा कर्व्ह डार्क एडिशनमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि सेफ्टी फीचर्स दिले जातील जसे की, ड्युअल डिजिटल स्क्रीन (इन्फोटेनमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल,व्हेंटिलेटेड पॉवर्ड फ्रंट सीट्स,
मूड लाइटिंगसह व्हॉइस-कंट्रोल पॅनोरॅमिक सनरूफ,कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यामध्ये लेव्हल-२ ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम), ६ एअरबॅग्ज, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (EPB) आणि ड्रायव्हर डोझ-ऑफ अलर्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये असतील.
किंमत किती राहील?
टाटा कर्व्ह डार्क एडिशनची किंमत सध्या उपलब्ध असलेल्या कर्व्हच्या टॉप व्हेरिएंटपेक्षा अधिक असेल. सध्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत १९.२ लाख रुपये आहे, त्यामुळे डार्क एडिशनची किंमत त्यापेक्षा किंचित जास्त असण्याची शक्यता आहे. या गाडीची स्पर्धा हुंडई क्रेटा नाईट एडिशन आणि होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन यांसारख्या मॉडेल्सशी होणार आहे.