कार खरेदी करणाऱ्यांनो पैसे तयार ठेवा, ‘या’ तारखेला टाटा ऑफिशियली लॉन्च करणार Tata Curvv एसयूव्ही कार, कसे असतील फीचर्स ?

Tejas B Shelar
Published:
Tata Curvv SUV Launching Date

Tata Curvv Suv Launching Date : गाडी असावी तर टाटाची असे म्हणणे तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. नवीन गाडी खरेदी करायला निघालेला एक मोठा वर्ग टाटाच्या वाहनांना पसंती देतो. Tata हे विश्वासाचे दुसरे नाव बनले आहे. टाटाच्या गाड्या खूपच सुरक्षित असतात, असा दावा कंपनी तर करतेच शिवाय ग्राहकांकडूनही असा दावा होतो. टाटा कंपनीच्या याच सुरक्षिततेसंदर्भातील अनेक व्हिडिओचे वेळोवेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळतात.

दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या काळात टाटाची कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे टाटा कंपनी लवकरच Tata Curvv SUV लॉन्च करणार आहे. 7 ऑगस्ट 2024 ला ही गाडी ऑफिशियल कंपनीकडून लॉन्च होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

यामुळे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर आत्तापासूनच पैशांची जुळवाजुळव करून ठेवावी लागणार आहे. ही SUV ICE आणि इलेक्ट्रिक या दोन्ही प्रकारांमध्ये लॉन्च केली जाणार आहे. ICE आणि EV हे दोन्ही मॉडेल कंपनी एकाच दिवशी लॉन्च करणार आहे. यामुळे नक्कीच हा लॉन्चिंग सोहळा एक ग्रँड इव्हेंट ठरणार आहे. दरम्यान आता आपण टाटा कंपनीच्या या अपकमिंग SUV चे फीचर्स थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे असतील फिचर्स

ही कर्व कुपे स्टाईलची देशातील पहिली SUV ठरणार आहे. या विशिष्ट डिझाईनमुळे या एसयूव्हीचा वेग हा अधिक राहणार असा दावा होत आहे. या अपकमिंग कार मध्ये मोठी चाके आणि ग्राउंड क्लीयरन्स पण चांगले राहणार आहे. यामुळे कसेही रस्ते असले तरीदेखील ही गाडी त्या रस्त्यांवर उपयुक्त ठरणार आहे.

ग्रामीण भागात, प्रामुख्याने शेत शिवारांमधील रस्त्यांवर ही गाडी मोठी उपयुक्त ठरणार आहे. कंपनी ही अपकमिंग कार दोन नवीन रंगात सादर करत आहे. व्हर्च्युअल सनराइज त्याच्या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये उपलब्ध असेल आणि गोल्ड एसेन्स थीम पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही गाडी लाँग ड्राईव्हसाठी देखील खूपचं फायदेशीर राहिल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कर्व्ह SUV कूप डिझाइनसह एक प्रगत आणि आधुनिक इंटीरियरसह लवकरच ग्राहकांच्या पसंतीस खरी उतरणार असा विश्वास कंपनीला आहे. कंपनीने कारच्या प्रीमियम अपीलवर भर दिला आहे.

केबिनमध्ये फर्स्ट-इन-क्लास तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. यात पॅनोरामिक सनरूफसह मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. कर्व ही अपकमिंग एस यु व्ही पेट्रोल-डिझेल तसेच इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये लाँच होणार आहे.

या गाडीत 1.2-लीटर पेट्रोल मिळेल, जे 125 PS पॉवर आणि 225 Nm टॉर्क जनरेट करणार आहे. त्याच वेळी, 1.5 लीटर डिझेल इंजिन 115 पीएस पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

या अपकमिंग एसयूव्ही कारची इलेक्ट्रिक आवृत्ती सर्वोत्तम इन-क्लास ड्रायव्हिंग रेंजसह बाजारात दाखल होणार आहे. यात Nexon EV पेक्षा मोठा बॅटरी पॅक मिळू शकतो, अशी माहिती काही रिपोर्ट मधून हाती आली आहे.

ही गाडी एका चार्जमध्ये 500Km पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम राहील असेही बोलले जात आहे. टाटा नेक्सॉन एका चार्जिंगमध्ये 452Km पर्यंतची रेंज देते, अर्थातच ही गाडी नेक्सॉन पेक्षा अधिक ड्रायविंग रेंज देणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe