Tata पुन्हा ठरली बिग बॉस ! तब्बल 1.50 लाख इलेक्ट्रिक कार विक्री करण्याचा भीष्म पराक्रम टाटाच्या नावावर, कोणत्या गाड्यांची सर्वाधिक विक्री? पहा….

Tejas B Shelar
Published:
Tata Electric Cars

Tata Electric Cars : गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागली आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली असून अनेक नामांकित कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांचे प्रोडक्शन वाढवले आहे. इलेक्ट्रिक कार, टू व्हीलर आणि स्कूटरची संख्या अलीकडे खूपच वाढली आहे.

इलेक्ट्रिक कार सेगमेंटचा विचार केला तर यामध्ये टाटा कंपनीचा बोलबाला आहे. टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट हा खूपच स्ट्रॉंग आहे. सध्या तरी टाटा कंपनीचा या सेगमेंटमध्ये कोणीच हात धरण्यास सक्षम नसल्याचे भासत आहे.

दरम्यान टाटा कंपनीने एक नवीन माईलस्टोन सेट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीने तब्बल दीड लाख इलेक्ट्रिक कार विक्रीचा टप्पा नुकताच गाठला आहे. अशी कामगिरी करणारी टाटा कंपनी ही देशातील एकमात्र कंपनी आहे.

कंपनीने फायनान्शिअल एअर 2024 मध्ये 73,800 इलेक्ट्रिक व्हेईकल विकले आहेत आणि फायनान्शिअल एअर 2023 मध्ये 50000 युनिट विकले होते.

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओबाबत बोलायचं झालं तर कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांचा तुलनेत खूपच स्ट्रॉंग आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्ट पोलिओ मध्ये सध्या 4 मॉडेल्स आहेत. देशातील इतर कंपन्यांशी तुलना केली असता ही संख्या अधिक आहे.

विशेष म्हणजे भविष्यात आणखी काही इलेक्ट्रिक कार टाटा कंपनी लॉन्च करणार असे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. Curve EV आणि Harrier EV या दोन इलेक्ट्रिक कार बाजारात लवकरच लॉन्च होऊ शकतात असा दावा केला जात आहे.

म्हणजेच नजीकच्या भविष्यात टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ आणखी मजबूत होणार आहे. सध्या कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये Nexon EV, Tiago EV, Tigor EV आणि पंच EV यांचा समावेश आहे.

त्यांच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर ते ७.९९ लाख ते १९.४९ लाख रुपये आहेत. टाटा कंपनीने अलीकडेच लॉन्च केलेल्या टाटा पंच EV या इलेक्ट्रिक एसयूव्हीला ग्राहकांच्या माध्यमातून चांगली मागणी आहे.

ही गाडी ग्राहकांमध्ये कमी कालावधीतच लोकप्रिय बनली आहे. टाटा पंच आणि टाटा नेक्सॉन EV या दोन गाड्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या गाड्या खूपच सुरक्षित असून फॅमिली साठी बेस्ट कार म्हणून ओळखल्या जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe