Tata Harrier EVः टाटा ही भारतातील एक लोकप्रिय व विश्वसनिय कार कंपनी आहे. याच कंपनीची बहुप्रतिक्षित टाटा हॅरियर ईव्ही 3 जूनला भारतात लाँन्च केली जाणार आहे. ही कार टाटा कर्व ईव्हीची जागा घेईल. टाटा मोटर्सने या कारचे यापूर्वीच प्रदर्शन केले आहे. भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये हे माँडेल तयार करण्यात आले होते.
कशी आहे कार?
या कारच्या हार्डवेअरबाबत टाटा मोटर्सकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ही कार एका चार्जवर 500 किलोमिटर रेंज देईल, असे सांगितले जात आहे. याशिवाय टाटाचे हे पहिले मांडेल असेल ज्यामध्ये 4 डब्लूडी ड्राईव्हट्रेन असणार आहे. ड्युअल मोटर सेटअप ही या कारमध्ये देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कशी असेल ईव्ही कार?
टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो 2025 मध्ये या गाडीची झलक दाखवली होती. टाटा हॅरिअर ईव्हीचे माँडेल तसेच असण्याची शक्यता आहे. डिझेल हॅरिअर फेसलिफ्टसारखीच ती दिसेल. पुर्ण रुंदीच्या लाईट बारने जोडलेले ईलईडी हेडलाईट त्यात असतील. मागील बाजूस कनेक्टेड लाईट बार, बंपर माऊटेन वर्टिकल फाँग लॅम्स हाऊसिंग यात असणार आहेत.
टाटाची ईव्हीमध्ये चलती
टाटा मोटर्स सध्या टियागो ईव्ही, टिगोर ईव्ही, नेक्सन ईव्ही कर्व्ह ईव्ही आणि पंच ईव्ही यारारख्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करत आहे. टाटा मोटर्स सध्या भारतीय इलेक्टिक कार्सच्य बाजारात सिंहाचा वाटा उचलत आहे. त्यामुळे टाटाची ही नवी हॅरिअर ईव्हीही एकदम तगडी असेल, असे सांगितले जात आहे.
किती असेल किंमत
टाटा हॅरिअर ईव्हीची किंमत 24 ते 30 लाखांदरम्यान असेल, असे सांगितले जात आहे. या किंमतीमुळे ती हुंडाई क्रेटा ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही, किआ कॅरेन्स ईव्ही आणि आगामी मारुती सुझुकी विटारा ईव्ही सारख्या माँडेलला थेट टक्कर देईल, असे सांगितले जात आहे.