Electric Car : इलेक्ट्रिक कार उद्योगात टिकून राहण्यासाठी टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन विभागाची घोषणा केली, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड अंतर्गत तीन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे, ज्या अंतर्गत कंपनी पुढील 10 वर्षांसाठी इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. दरम्यान, टाटा आपल्या काही पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याच्या देखील तयारीत आहे.
टाटा मोटर्सच्या IC इंजिन आर्किटेक्चर रेंजमध्ये Tata Nexon EV आणि नवीन Tiago EV यांचा समावेश आहे. त्याच वेळी, आगामी Tata Altroz EV आणि Tata Punch EV सिग्मा प्लॅटफॉर्मवर तयार केले जातील. सिग्मा प्लॅटफॉर्म अल्फा आर्किटेक्चरवर आधारित आहे. असे मानले जाते की इलेक्ट्रिक मॉडेलसाठी हे अधिक चांगले असेल.
आगामी टाटा इलेक्ट्रिक कार या ब्रँडच्या Ziptron हाय-व्होल्टेज तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्याची बॅटरी क्षमता, शक्ती आणि श्रेणी याबद्दल माहिती पुढीप्रमाणे…
रिपोर्ट्सनुसार, टाटा पंच ईव्हीला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 300 किलोमीटरहून अधिकची रेंज मिळेल. याशिवाय, टाटा Altroz EV आणि Tata Panch EV वर काही EV-विशिष्ट डिझाइन अपडेट्स सादर करेल.
Tata Altroz EV आणि Tata Punch EV हे दोन्ही मॉडेल 2023 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. Altroz EV आणि Punch EV च्या किमती त्यांच्या पेट्रोल-डिझेल प्रकारांपेक्षा जास्त असतील. सध्या, Tata Altroz हॅचबॅक मॉडेल लाइनअपची किंमत 6.35 लाख ते 10.25 लाख रुपये आहे. तर पंच मिनी एसयूव्हीची किंमत ६ लाख ते ९.५४ लाख रुपये आहे.