टाटा कंपनीच्या ‘या’ गाडीवर मिळतो 1.35 लाख रुपयांचा डिस्काउंट ! कधीपर्यंत सुरू राहणार डिस्काउंट ऑफर?

Tejas B Shelar
Published:
Tata Motors Discount Offer

Tata Motors Discount Offer : टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक उप कंपनी आहे. भारतात टाटा मोटर्सचे अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट चा विचार केला असता कंपनीकडे इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये सर्वात जास्त मॉडेल उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात टाटा आणखी काही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

दुसरीकडे पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीमध्येही कंपनीकडे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत. दरम्यान कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही लोकप्रिय कार्सवर डिस्काउंट ऑफर देखील दिला जात आहे.

कंपनीकडून आपल्या काही निवडक गाड्यांवर लाखो रुपयांचा डिस्काउंट ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, टाटा कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढावा यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर देखील डिस्काउंट देत आहे.

कंपनीच्या माध्यमातून सर्वात जास्त डिस्काउंट आपल्या एका लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV वर दिला जात आहे. Tata Nexon EV या इलेक्ट्रिक कार वर कंपनीच्या माध्यमातून 1.35 लाख रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

पण तुम्हाला जर या डिस्काउंट चा लाभ घ्यायचा असेल तर ही गाडी लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे. कारण की ही डिस्काउंट ऑफर फक्त जून महिन्यापुरती मर्यादित राहणार आहे. यानंतर ही ऑफर कदाचित बंद होऊ शकते.

कोणत्या मॉडेलवर मिळतोय सर्वाधिक डिस्काउंट

मिळालेल्या माहितीनुसार टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकवर सर्वाधिक एक लाख 35 हजाराचा डिस्काउंट दिला जात आहे. ही डिस्काउंट ऑफर टाटा नेक्सॉन 2023 इलेक्ट्रिक मॉडेलसाठी लागू आहे. कंपनीच्या या चालू वर्षाच्या अर्थातच 2024 टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकवर 85,000 चा डिस्काउंट मिळत आहे.

खरंतर कंपनीची ही एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान या गाडीची ग्राहक संख्या वाढावी यासाठी कंपनीकडून हा डिस्काउंट ऑफर सुरू करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक SUV टाटा नेक्सॉनची किंमत किती आहे

टाटा नेक्सॉन या इलेक्ट्रिक SUV च्या किमती बाबत बोलायचं झालं तर या इलेक्ट्रिक कारच्या बेस वेरिएंटची किंमत 14 लाख 49 हजार रुपये एवढी आहे. तसेच या कारच्या टॉप वेरिएंटची किंमत 19 लाख 29 हजार रुपये एवढी आहे. पण, या किमती एक्स शोरूम आहेत. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe