Tata Motors : तुम्हालाही नवी कार खरेदी करायची आहे का मग तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. विशेषता ज्यांना इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी बातमी खास ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढलीये. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती तसेच सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढलाय.
यामुळे आता अनेक दिग्गज ऑटो कंपन्या नवनवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात लॉन्च करत आहेत. यामध्ये टाटा कंपनी आघाडीवर आहे. टाटा मोटरच्या इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ फारच मजबूत आहे. अलीकडेच टाटा मोटर्स ने टाटा कर्व EV लॉन्च केलीये.

दरम्यान जर तुम्हाला या महिन्यात ही इलेक्ट्रिक SUV खरेदी करायची असेल तर तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत. कारण की या गाडीवर तब्बल 1.80 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर मिळतो. या डिस्काउंट ऑफरमुळे टाटा कंपनीच्या या इलेक्ट्रिक SUV ची किंमत 17.49 लाख रुपये (एक्स शोरूम) झाली आहे.
यामुळे जर तुम्हाला या महिन्यात इलेक्ट्रिक एसव्ही खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटाच्या या गाडीचा पर्याय अभ्यास ठरू शकतो. दरम्यान आता आपण टाटा कंपनीच्या या नव्याने लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक SUV च्या फीचर्स बाबत आणि स्पेसिफिकेशन बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत फिचर्स अन स्पेसिफिकेश?
Tata Curvv EV (45 kWh) फुल चार्ज केल्यानंतर 502 किलोमीटरची रेंज देते. Tata Curvv EV ( 55 kWh) फुल चार्ज केल्यानंतर 585 किलोमीटरची रेंज देते. कर्व EV चे एक्स्टेरियर फारच युनिक आहे. या गाडीला स्लीक LED हेडलॅम्प, LED DRLs आणि वेलकम-गुडबाय अॅनिमेशनसह कनेक्टेड टेललॅम्प देण्यात आले आहेत.
तसेच क्लोज्ड फ्रंट ग्रिल, स्लोपिंग रूफलाइन, 18-इंच अलॉय व्हील्स आणि फ्लश डोर हँडल्समुळे या कारला स्पोर्टी लुक मिळतो. शिवाय शार्क फिन अँटेना, रूफ-माउंटेड स्पॉइलर व सिल्व्हर स्किड प्लेटसह तिचं एयरोडायनॅमिक डिझाईनमुळे गाडी फारच उठावदार बनली आहे.
ही गाडी ग्राहकांना पाच कलर शेड्स मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रिस्टीन व्हाईट, फ्लेम रेड, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्योर ग्रे व वर्चुअल सनराईज या कलर ऑप्शनमध्ये ही गाडी ग्राहकांना मिळते. या SUV मध्ये 500 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलाय.
हा स्पेस जवळपास 975 लिटर पर्यंत वाढतो. या गाडीच्या इंटीरियर मध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, मूड लाइटिंगसह व्हॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ, टच व टॉगल क्लायमेट कंट्रोल पॅनल तसेच 12.3 इंच फ्लोटिंग टचस्क्रीन व 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आलाय. सीटिंगसाठी वेंटिलेटेड व अॅडजस्ट होणाऱ्या आधुनिक सीट्स देण्यात आल्या आहेत.
गाडीमध्ये बसले की तुम्हाला एकदम प्रीमियम फील येणार आहे. यात अनेक सेफ्टी फीचर्सही मिळतात. 6 एअरबॅग्स, 360° कॅमेरा, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, ADAS फीचर्स, लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन व ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन या सेफ्टी फीचर्स मुळे ही गाडी ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत चालली आहे.