Tata Motors पुन्हा देणार ग्राहकांना धक्का ! ‘ह्या’ कार्स महागणार ; खरेदीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Tata Motors : तुम्ही देखील तुमच्यासाठी येणाऱ्या काळात भारतीय ऑटो कंपनी टाटा मोटर्सची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्हाला टाटा मोटर्सची नवीन कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या टाटा मोटर्सने एक मोठा निर्णय घेत 1 मे 2023 पासून आपल्या कारच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यावेळी कारच्या किमतीमध्ये 0.60% पर्यंत वाढ होणार आहे. मात्र कोणत्या कारवर किती वाढ होणार आहे याची माहिती 1 मे 2023 नंतर कळेल.  मात्र मिळालेल्या माहितीनुसार विविध मॉडेल्स आणि त्यांच्या व्हेरियंटवर कंपनी वेगवेगळी दरवाढ करू शकते.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की 1 मे पासून प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी 0.6% ने वाढवल्या जातील. व्हेरियंट, मॉडेलनुसार किंमती वाढतील. यापूर्वी, टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 5% वाढवल्या आहेत.

जानेवारीतही दर वाढले होते

Tata Motors ने 27 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या सर्व ICE प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. 10 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीने Tiago EV ची किंमत सुमारे 20,000 रुपयांनी वाढवली. टाटा मोटर्सशिवाय मारुती, ह्युंदाई, महिंद्रा या कंपन्यांनीही या महिन्यात त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.

ऑडी खरेदी करणेही महागणार आहे

जर्मन कंपनी ऑडीने 1 मे 2023 पासून आपल्या निवडक कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी Audi Q3 आणि Audi Q3 Sportback च्या किमती 1.6% ने वाढवणार आहे. यापूर्वी, Audi Q8 Celebration, Audi RS5 आणि Audi S5 च्या किमती 2.4% ने वाढल्या होत्या. कोणत्या मॉडेलवर किती वाढ होणार याची यादी 1 मे रोजी समोर येणार आहे.

हे पण वाचा :-   IMD Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस ! जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe