गुड न्युज ! Tata कंपनी जून महिन्यात लाँच करणार ‘ही’ दमदार कार, पहा फिचर्स अन प्राईस लिस्ट

Tejas B Shelar
Published:
Tata New Car

Tata New Car : टाटा मोटर्स ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीची ग्राहक संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या कंपनीच्या गाड्यांचा एक मोठा चाहता वर्ग आपल्या देशात पाहायला मिळतो. दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या भविष्यात टाटा मोटर्सची कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची हॅचबॅक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनी आपला हॅजबॅक कारचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग करण्यासाठी बाजारात लवकरच धमाका करणार आहे. टाटा कंपनी लवकरच एक नवीन हॅचबॅक कार लॉन्च करणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गाडीची चर्चा होत आहे ती टाटा अल्ट्रोज रेसर ही हॅचबॅक गाडी कंपनी पुढील महिन्यात लॉन्च करणार असल्याची बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या मोस्ट अवेटेड गाडीची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

मात्र जेव्हा ही गाडी दिल्ली येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो जानेवारी 2024 मध्ये शोकेस करण्यात आली तेव्हापासून या गाडीच्या चर्चा अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही गाडी कधी लॉन्च होणार अशीही विचारणा अनेकांच्या माध्यमातून केली जात होती.

पण आता लवकरच ही आतुरता संपुष्टात येणार आहे कारण की ही गाडी भारतात लवकरच अधिकृतरित्या विक्रीसाठी लॉन्च केली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच भारतीय बाजारात लॉन्च केली जाणार असा दावा होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण या लोकप्रिय गाडीचे फीचर्स आणि किंमतीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इंजिन कसे आहे?

मीडिया रिपोर्टनुसार, टाटा कंपनीच्या या आगामी अल्ट्रोझ रेसरला 1.2-लिटर टर्बोचार्ज केलेले 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते जे 5,500 rpm वर 120bhp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 1,750 ते 4pm दरम्यान 170Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम राहणार आहे.

या गाडीची लांबी 3,990 मिमी, रुंदी 1,755 मिमी, उंची 1,523 मिमी आणि व्हीलबेस 2,501 मिमी एवढा राहणार आहे. सध्या जे स्टँडर्ड मॉडेल आहे त्याच्या तुलनेत Tata Altroz ​​Racer च्या डिझाइनमध्ये मोठा बदल ग्राहकांना पाहायला मिळणार आहे.

ज्या पद्धतीने याच्या स्टॅंडर्ड मॉडेल ला ग्राहक आणि पसंती दाखवली आहे त्याचप्रमाणे या नव्याने लॉन्च होणाऱ्या गाडीला देखील ग्राहकांची पसंती मिळेल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त होत आहे. या गाडीमध्ये ग्राहकांना अनेक अपडेटेड फीचर्स पाहायला मिळू शकतात.

याच्या इंटीरियरमध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सुरक्षेसाठी 6-एअरबॅग आणि 360-डिग्री कॅमेरा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कारमध्ये सक्रिय इलेक्ट्रिक सनरूफ देखील दिला जाणार आहे.

या गाडीत 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील, प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल दिले जातील, अशी माहिती समोर येत आहे. किमती विषयी अजून कंपनीच्या माध्यमातून कोणतीचं अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. यामुळे या गाडीच्या किमती स्टॅंडर्ड मॉडेल पेक्षा कितीने अधिक राहतात? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe