सर्वांची आवडती tata Nexon सीएनजी लॉन्च! मायलेज पाहून तुम्ही चकित होणार

टाटा मोटर्सने २०२५ च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपल्या नवीन टाटा नेक्सॉन सीएनजी रेड डार्क सादर केली आणि आता भारतीय बाजारात ही किफायतशीर सीएनजी कार लाँच केली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

Tata Nexon CNG:- टाटा मोटर्सने २०२५ च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये आपल्या नवीन टाटा नेक्सॉन सीएनजी रेड डार्क सादर केली आणि आता भारतीय बाजारात ही किफायतशीर सीएनजी कार लाँच केली आहे.

पेट्रोलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कमी किमतीत परवडणाऱ्या आणि चांगल्या मायलेज असलेल्या कारची आवश्यकता वाढली आहे.टाटा नेक्सॉन सीएनजी ही आवश्यकता पूर्ण करणारी एक उत्कृष्ट कार ठरू शकते.

विशेष वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉन सीएनजीमध्ये ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे समावेश करण्यात आले आहे. त्यात 10.20 इंचाच्या ड्युअल डिजिटल स्क्रीनसह, एलईडी लाईट पॅकेज, मागील एसी व्हेंटसह क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि टिल्टेड फ्रंट सीट्स सारखी सोयीसकर वैशिष्ट्ये आहेत.

इंजिन आणि मायलेज

टाटा नेक्सॉन सीएनजीमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 98.5 बीएचपी पॉवर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याच्या इंजिनला 6-स्पीड एमटी गिअरबॉक्स सह जोडले गेले आहे. खास गोष्ट म्हणजे टाटा नेक्सॉन सीएनजीमध्ये ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.जे अत्यधिक कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरते.

मायलेज किती?

मायलेजच्या बाबतीत टाटा नेक्सॉन सीएनजी हायवेवर 17.44 किलोमीटर प्रति किलोग्रॅम मायलेज देते, तर शहरात ते 11.65 किमी/किलो पर्यंत पोहोचू शकते. यात कमी किमतीत जास्त मायलेज मिळविण्याची टाटा कंपनीने दावा केला आहे.

किंमत किती?

टाटा नेक्सॉन सीएनजी वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत व्हेरिएंटनुसार बदलते. टाटा नेक्सॉन सीएनजी रेड डार्क क्रिएटिव्ह +एस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.70 लाख रुपये आहे, तर क्रिएटिव्ह +पीएस व्हेरिएंटची किंमत 13.70 लाख रुपये आहे. त्याचे टॉप व्हेरिएंट, रेड डार्क फियरलेस + पीएस, देखील 13.70 लाख रुपयांना उपलब्ध आहे.

सीएनजी कार उत्तम पर्याय

पेट्रोलच्या महागाईपासून मुक्त होण्यासाठी आणि चांगल्या मायलेजसाठी टाटा नेक्सॉन सीएनजी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अत्याधुनिक तंत्रज्ञान, पॉवरफुल इंजिन आणि सुमारे 17 किलोमीटरचे मायलेज या कारणांमुळे ही कार तुमच्यासाठी एक स्मार्ट निवड ठरू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट द्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe