Tata Nexon EMI : तुम्हालाही नवीन गाडी खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. खरे तर सरकारने अलीकडेच GST 2.0 ची अंमलबजावणी सुरू केली आहे.
यामुळे चार मीटर पेक्षा कमी लांबी असणाऱ्या गाड्या स्वस्त झाल्या आहेत. अशा स्थितीत जर तुम्हीही येत्या दिवाळीला नवीन गाडी घेणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

आज आपण टाटा नेक्सॉनचे बेस वेरिएंट खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट लावले तर किती रुपयांचा मासिक हफ्ता भरावा लागणार याचे कॅल्क्युलेशन आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
टाटा मोटर्स ही एक दिग्गज भारतीय ऑटो कंपनी आहे. कंपनीकडून आतापर्यंत शेकडो गाड्या लॉन्च करण्यात आल्या आहे. Sedan, Suv सर्वच सेगमेंटमध्ये कंपनी टॉपला आहे. सब-फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनी चांगली मजबूत आहे. याच सेगमेंटमध्ये Tata Nexon कारचा सुद्धा समावेश होतो.
Tata Nexon Smart हा या मॉडेलचा बेस व्हेरिएंट आहे. याची किंमत 7.32 लाख रुपये आहे. पण ही गाडीची एक्स शोरूम किंमत आहे. अर्थात ग्राहकांना प्रत्यक्षात गाडी खरेदी करताना यापेक्षा अधिक पैसे लागतील.
म्हणजे जर दिल्लीमध्ये ही कार खरेदी करायची असेल तर सुमारे 51 हजार रुपये आरटीओ व 40,000 रुपये इन्शुरन्स असे 8.23 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
आता आपण 8.23 लाख रुपयांची ही गाडी खरेदी करण्यासाठी दोन लाखांचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता लागेल हे समजून घेऊयात. समजा तुम्ही दोन लाख रुपये डाउन पेमेंट लावले तर तुम्हाला 6.23 लाख रुपये कर्ज घ्यावे लागणार आहे. बँक साधारणतः 9% व्याजदराने कारलोन उपलब्ध करून देते.
आता जर तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के इंटरेस्ट रेटवर 6.23 लाख रुपयांचे वाहन कर्ज मंजूर झाले तर अशा स्थितीत तुम्हाला दरमहा 9 हजार 124 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. या कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला सात वर्षांच्या काळात बँकेला 2.53 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.
म्हणजे जर तुम्ही फायनान्सवर टाटा नेक्सॉनचे बेस व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला 10.75 लाख रुपये खर्च करावे लागतील. पण येथे दिलेली माहिती ही अंदाजीत आहे. तुम्हाला याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळील डीलरशिपवर एकदा नक्कीच संपर्क साधायला हवा.













