Tata Nexon Ev Discount Offer : तुम्हालाही येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खरेदी करायची आहे का? मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना टाटा मोटर्सची टाटा नेक्सॉन EV ही इलेक्ट्रिक एसयुवी खरेदी करायची असेल त्यांना ही इलेक्ट्रिक कार स्वस्तात खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा कंपनीने या इलेक्ट्रिक व्हेईकलवर मोठा डिस्काउंट ऑफर सुरू केला आहे.
टाटा कंपनीने जुलै महिन्यात आपल्या सर्वच कारवर डिस्काउंट ऑफर आणली आहे. टाटा नेक्सॉन EV या एसयूव्हीवर देखील एक लाख 30 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी या मॉडेलच्या जवळपास सर्वच व्हेरिएंटवर डिस्काउंट देत आहे. मात्र व्हेरिएंटनुसार डिस्काउंटची रक्कम कमी जास्त आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमधील ही एक सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी ही गाडी खरेदी केली आहे. दरम्यान कंपनीने या गाडीचा सेल आणखी वाढावा यासाठी यावर डिस्काउंट ऑफर आणला आहे.
या मॉडेलचे बेस व्हेरिएंट सोडून उर्वरित सर्वच्या सर्व 9 व्हेरिएंटवर कंपनीकडून हजारो रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीने या ऑफरला सेलिब्रेटरी ऑफर असे नाव दिले आहे. दरम्यान आता आपण कंपनीच्या या ऑफर अंतर्गत टाटा नेक्सॉन EV या लोकप्रिय SUV च्या कोणत्या व्हेरिएंटवर किती डिस्काउंट मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
Tata Nexon EV वर किती डिस्काउंट मिळतोय?
फिअरलेस एमआर : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 50 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जातोय. याची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख रुपये आहे.
फिअरलेस + MR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 16.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
फिअरलेस + SMR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 16.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
फिअरलेस LR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 16.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
फिअरलेस + LR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
फिअरलेस + SLR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 17.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
एम्पावर्ड MR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 70 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
एम्पावर्ड +LR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 1 लाख 30 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 19.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Dk एम्पावर्ड +LR : या व्हेरिएंटवर कंपनीकडून 1 लाख 30 हजाराचा डिस्काउंट मिळतोय. याची एक्स शोरूम किंमत 19.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.