Tata Nexon EV मधील हे मॉडेल झाले बंद ! का घेतला टाटांनी हा धक्कादायक निर्णय ?

Karuna Gaikwad
Published:

Tata Nexon EV News : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Tata Motors ही एक प्रमुख कंपनी आहे, जी आपल्या दमदार आणि विश्वसनीय गाड्यांसाठी ओळखली जाते. Tata Nexon EV हा भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV असून, कंपनीने या कारचे विविध व्हेरिएंट्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने Nexon EV चा 40.5 kWh बॅटरी पॅक असलेले व्हेरिएंट बंद केलं आहे. यामागील कारण काय आहे आणि आता ग्राहकांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती घेऊया.

Nexon EV चे हे मॉडेल झाले बंद

टाटा मोटर्सने आपल्या Tata Nexon EV मधील 40.5 kWh बॅटरी वेरिएंट बाजारातून काढून टाकला आहे. या वेरिएंटमधील दमदार बॅटरीमुळे चांगली रेंज मिळत होती, पण तरीही हा प्रकार कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या Tata Motors ने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र कंपनीच्या वेबसाइटवरून हे वेरिएंट हटवण्यात आल आहे.

40.5 kWh वेरिएंट का बंद केले ?

कंपनीने हे वेरिएंट का बंद केल आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र, बाजारातील स्पर्धा, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा कल लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असावा. तसेच, भविष्यात कंपनी हा वेरिएंट पुन्हा लॉन्च करेल का, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

Tata Nexon EV चे नवीन पर्याय

आता Tata Nexon EV ग्राहकांसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत – पहिला म्हणजे 30 kWh बॅटरी वेरिएंट आणि दुसरा आहे 45 kWh बॅटरी वेरिएंट
यामुळे आता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार दोन वेगवेगळ्या बॅटरी क्षमतेचे पर्याय मिळतील. ज्यांना कमी रेंजसह परवडणारा पर्याय हवा आहे, त्यांच्यासाठी 30 kWh वेरिएंट चांगला आहे, तर अधिक मायलेजसाठी 45 kWh वेरिएंट उपलब्ध आहे.

Tata Nexon EV चे प्रमुख फीचर्स

Tata Nexon EV मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी टेल लॅम्प्स, पॅडल शिफ्टर्स, चार्जिंग पोर्ट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, मागील AC वेंट्स, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, पॅनोरॅमिक सनरूफ, पार्किंग सेन्सर्स, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, हिल असिस्ट, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, ESP, सहा एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स, OTA अपडेट्स, ऑटो डिमिंग IRVM, एअर प्युरिफायर, ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो आणि वायरलेस चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Tata Nexon EV बॅटरी

30 kWh वेरिएंट : मोटर पॉवर: 95 kW, टॉर्क: 215 Nm, 0-100 किमी/तास, वेग: 9.2 सेकंद, रिअल वर्ल्ड रेंज: 210-230 किमी

45 kWh वेरिएंट : मोटर पॉवर: 106 kW, टॉर्क: 215 Nm, 0-100 किमी/तास, वेग: 8.9 सेकंद, रिअल वर्ल्ड रेंज: 350-375 किमी

Tata Nexon EV ची किंमत

Tata Nexon EV ची किंमत भारतीय बाजारात ₹12.49 लाखांपासून सुरू होते आणि टॉप वेरिएंटसाठी ₹17 लाखांपर्यंत जाते (एक्स-शोरूम किंमत) Tata Motors ने Nexon EV चा 40.5 kWh वेरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी, ग्राहकांसाठी 30 kWh आणि 45 kWh असे दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. नवीन वेरिएंटमध्येही प्रगत तंत्रज्ञान आणि चांगली ड्रायव्हिंग रेंज दिली जात असल्याने Tata Nexon EV अजूनही एक उत्तम इलेक्ट्रिक SUV पर्याय ठरतो. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर उपलब्ध पर्याय तपासून योग्य वेरिएंट निवडणे फायद्याचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe