टाटा मोटर्स लवकरच भारतीय बाजारपेठेत न्यू. जनरेशन Tata Nexon Facelift लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या आगामी मॉडेलला “Garuda” असे कोडनेम देण्यात आले आहे.ही कार पुढील पिढीच्या X1 प्लॅटफॉर्म वर आधारित असेल, ज्यामध्ये अनेक नवीन अपडेट्स पाहायला मिळतील.यामध्ये आकर्षक डिझाईन, प्रगत फीचर्स आणि इंजिनचे नवीन पर्याय समाविष्ट असतील.
Tata Nexon Facelift 2027
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagarlive-24-News-11.jpg)
टाटा नेक्सॉनची सुरुवात 2017 मध्ये झाली, त्यानंतर 2020 आणि 2023 मध्ये अपडेटेड व्हर्जन सादर करण्यात आले. हे वाहन टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. नवीन Tata Nexon 2027 ही X1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे, 1990 च्या दशकातील Tata Indica देखील याच प्लॅटफॉर्मवर आधारित होती. सध्याच्या टाटा नेक्सॉनमध्ये याच प्लॅटफॉर्ममध्ये काही सुधारणा केल्या आहेत, आणि 2027 च्या फेसलिफ्टमध्ये आणखी मोठे बदल अपेक्षित आहेत. डिझाईनच्या बाबतीतही मोठे बदल पाहायला मिळतील. टाटा मोटर्सच्या नवीन पिढीतील मॉडेल्ससारखाच याचा फ्यूचरिस्टिक डिझाईन असेल.
इंटीरियर आणि फीचर्स
नवीन टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये केवळ बाह्य भागच नाही, तर केबिनमध्येही मोठे बदल करण्यात येणार आहेत. हे इंटीरियर अधिक फ्यूचरिस्टिक, आरामदायी आणि प्रीमियम असेल. मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Wireless Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान,360-डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड आणि हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट्स हे सर्व फीचर्स कारमध्ये असणार आहेत.
इंजिन
इंजिनच्या बाबतीत नवीन टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये सध्याचेच इंजिन पर्याय वापरण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध राहील की नाही, हे भारत सरकारच्या आगामी उत्सर्जन नियमांवर अवलंबून असेल. BS6 फेज 2 नियमांमुळे टाटा नेक्सॉनमध्ये विशेष प्रकारच्या उत्प्रेरक प्रणालीशिवाय डिझेल इंजिन देण्यात आले होते. मात्र, BS7 मानक लागू झाल्यास, इंजिनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. यासंबंधी अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
नवीन Tata Nexon Facelift हे दमदार डिझाइन, अत्याधुनिक फीचर्स आणि सुधारित इंजिनसह सादर होणार आहे. 2027 पर्यंत या SUV ची भारतीय बाजारपेठेत एंट्री होण्याची शक्यता आहे. इच्छुक ग्राहकांसाठी ही एक उत्तम अपडेटेड निवड ठरेल