Tata Nexon : टाटा नेक्सॉनचे 2 नवीन बेस मॉडेल लॉन्च, किंमत 7.99 लाख रुपयांपसून सुरु, जाणून घ्या डिटेल्स!

Ahmednagarlive24 office
Published:
Maruti Suzuki Cars

Tata Nexon : Tata Nexon : ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार उत्पादक कपंनीने नुकतेच आपल्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉनचे डिझेल आणि पेट्रोल मॉडेल लॉन्च केले आहे. कपंनीने या कार्स 7.99 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीत लॉन्च केल्या आहेत.

कंपनीने टाटा नेक्सॉनची विक्री वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षात Tata Nexon च्या विक्रीत सातत्याने वाढ झाल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये त्यात अचानक घट झाली.

दुसरीकडे, टाटा पंच गेल्या महिन्यात कंपनीची तसेच देशाची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेली Tata Nexon, महिंद्रा XUV3X0, Maruti Suzuki Brezza आणि Kia Seltos सारख्या SUV सोबत स्पर्धा करते. कपंनीने लॉन्च केलेल्या या दोन नवीन मॉडेलबद्दल कोणते खास फीचर्स दिले आहेत चला पाहूया…

कंपनीने पेट्रोल प्रकारासाठी नवीन बेस मॉडेल टाटा नेक्सॉन स्मार्ट (ओ) लॉन्च केले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. दुसरीकडे, कंपनीने डिझेल प्रकारासाठी नवीन बेस मॉडेल टाटा नेक्सॉन स्मार्ट लॉन्च केले आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.

कंपनीने अद्याप आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपडेट केलेले नाही. Tata Nexon Smart चे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. दुसरीकडे, कारच्या आतील भागात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, 4-स्पीकर, रिव्हर्स कॅमेरा, शार्क फिन अँटेना, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Tata Nexon ची मागील काळापासूनची विक्री

जर आपण गेल्या महिन्याच्या विक्रीबद्दल बोललो तर, टाटा नेक्सनने या कालावधीत एकूण 11,168 एसयूव्हीची विक्री केली होती. या सेलमध्ये Tata Nexon EV चाही समावेश होता. या कालावधीत, वार्षिक आधारावर Tata Nexon च्या विक्रीत 25.56 टक्के ची घट झाली आहे. तर मासिक आधारावर देखील Tata Nexon च्या विक्रीत 20.56 टक्के ची घट दिसून आली.

बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये, Tata Nexon ने SUV च्या एकूण 15,002 युनिट्सची विक्री केली होती. तर मार्च 2024 मध्ये, Tata Nexon SUV च्या एकूण 14,058 युनिट्सची विक्री झाली. कौटुंबिक सुरक्षेसाठी, Tata Nexon ला ग्लोबल NCAP ने क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe