Tata Punch खरेदीची सुवर्णसंधी ! कंपनीकडून मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, कधीपर्यंत सुरु राहणार ऑफर ?

Tejas B Shelar
Published:
Tata Punch Discount Offer

Tata Punch Discount Offer : टाटाची कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. Tata मोटर्स ही भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यात पंच एसयूव्ही या कारचा देखील समावेश होतो. असं म्हणण्यापेक्षा टाटाची ही कार कंपनीच्या इतर कार्सपेक्षा अधिक ताकतवर अन लोकप्रिय आहे.

ही गाडी कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या गाडीच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. SUV सेगमेंटमध्ये या गाडीचा मोठा दबदबा आहे. या गाडीने 4 लाख युनिट्सची विक्रीचा टप्पा खूपच जलद गतीने पूर्ण केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात या गाडीने तब्बल एक लाख कार विक्रीचा टप्पा देखील गाठला आहे.

यामुळे सध्या या गाडीची मोठी चर्चा सुरू आहे. विशेष बाब अशी की आगामी काळात या गाडीची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण की कंपनीने या गाडीचा सेल वाढवण्यासाठी एक मोठी डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना 25,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. खास बाब म्हणजे कंपनी पंचच्या पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफर केली जात आहे.

म्हणजे ग्राहकांनी या महिन्यात ही गाडी खरेदी केले तर त्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. खरे तर गेल्या महिन्यात देखील म्हणजे जुलै महिन्यात देखील या गाडीवर कंपनीकडून डिस्काउंट दिला जात होता.

गेल्या महिन्यात सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही मॉडेल्स वर अठरा हजार रुपयांची सूट दिली जात होती. पण या चालू महिन्यात हा डिस्काउंट वाढवून दिला जात आहे. या चालू महिन्यात टाटा पंच पेट्रोल खरेदी केल्यास पंचवीस हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे आणि सीएनजी गाडी खरेदी केल्यास वीस हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

या डिस्काउंट ऑफर मध्ये कॅश आणि कॉर्पोरेट डिस्काउंट चा समावेश आहे. टाटा पंच पेट्रोल वर 20000 रुपयांचा कॅश आणि पाच हजार रुपयांचा कार्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. दुसरीकडे टाटा पंच सीएनजीवर पाच हजाराचा कार्पोरेट आणि 15000 रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.

मात्र ही ऑफर फक्त ऑगस्ट महिन्यापूर्वी मर्यादित राहणार आहे. यामुळे जर तुम्हाला या गाडीच्या खरेदीवर डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर या चालू महिन्यातच ही कार खरेदी करावी लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की टाटा पंचची सुरुवातीची किंमत सहा लाख बारा हजार 900 रुपये एवढी आहे. पण जर या महिन्यात तुम्ही ही गाडी घेतली तर तुम्हाला यापेक्षा कमी किमतीत ही गाडी खरेदी करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe