Tata Punch EV वर धमाका ऑफर! महिन्याला फक्त 19500 एमआयमध्ये घरी न्या… संधी दवडू नका!

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जर तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असाल आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधत असाल तर टाटा पंच ईव्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ किफायतशीर नाही तर सुरक्षिततेच्या बाबतीतही देशातील सर्वात विश्वसनीय कारपैकी एक मानली जाते.

Ratnakar Ashok Patil
Published:

Tata Punch EV:- भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. जर तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असाल आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधत असाल तर टाटा पंच ईव्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ किफायतशीर नाही तर सुरक्षिततेच्या बाबतीतही देशातील सर्वात विश्वसनीय कारपैकी एक मानली जाते.

टाटा पंच ईव्हीची किंमत आणि फायनान्स प्लॅन

टाटा पंच ईव्हीची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख आहे. दिल्लीत तिची ऑन-रोड किंमत सुमारे 10.37 लाख आहे. ज्यामध्ये 38,000 हजार विमा खर्च आणि 39,000 हजार इतर शुल्क समाविष्ट आहे.

जर तुम्ही ही कार खरेदीसाठी 1 लाख डाउन पेमेंट केले आणि उर्वरित रक्कम कर्जावर घेतली, तर खालीलप्रमाणे ईएमआय प्लॅन असेल:

5 वर्षांसाठी कर्ज (9% व्याजदर) – दरमहा 19,500 ईएमआय

4 वर्षांसाठी कर्ज (9% व्याजदर) – दरमहा 23,000 ईएमआय

टाटा पंच ईव्हीची पॉवर आणि रेंज

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.25 किलोवॅट बॅटरी 315 किमी रेंज आणि 35 किलोवॅट बॅटरी 421 किमी रेंज

पंच ईव्हीची प्रीमियम वैशिष्ट्ये

10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, ड्युअल-टोन अपहोल्स्ट्री आणि ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर प्युरिफायरसह AQI डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस चार्जर इत्यादी फीचर्स देण्यात आले आहेत.

सुरक्षिततेमध्ये टॉप

टाटा पंच ईव्हीला Bharat NCAP 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि ऑटो होल्ड यांसारख्या उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

जर तुम्हाला किफायतशीर, सुरक्षित आणि लॉन्ग-रेंज इलेक्ट्रिक कार हवी असेल तर टाटा पंच ईव्ही हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हीही फक्त 1 लाख डाउन पेमेंट भरून या कारला घरी आणू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe