Tata Punch Vs Hyundai Exter : टाटा आणि ह्युंदाई या दोन दिग्गज ऑटो कंपन्या. या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत. टाटा आणि ह्युंदाई या दोन्ही कंपनीचे अनेक मॉडेल ग्राहकांमध्ये सुपर-डुपर हिट ठरले आहेत. दरम्यान, ह्युंदाई कंपनी टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारात एक नवीन एडिशन लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्युंदाई कंपनी आपल्या अलीकडेच लॉन्च झालेल्या लोकप्रिय एक्स्टर या कारचे Knight Edition भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
यामुळे टाटा पंचला नजिकच्या भविष्यात चांगले तगडे कॉम्पिटिशन मिळणार आहे. सध्या टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टर या दोन्ही गाड्यांमध्ये कॉम्पिटिशन आहेच.
मात्र जेव्हा ह्युंदाई कंपनीचे हे नाईट एडिशन लॉन्च होईल तेव्हा हे कॉम्पिटिशन आणखी तगडे होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ह्युंदाई कंपनीने याआधीही आपल्या दोन लोकप्रिय मॉडेलचे नाईट एडिशन लॉन्च केले आहे.
कंपनीने क्रेटा आणि वेन्यू या दोन गाडींचे नाईट एडिशन लॉन्च केले असून आता या एक्स्टरचे Knight Edition लॉन्च होणार असल्याची खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. या गाडीचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही गाडी पूर्णपणे ब्लॅक राहणार आहे.
ग्रील, अलॉय व्हील, रूफ रेल्स, पिलर्स आणि टेलगेट यांसारख्या वाहनाच्या सर्व भागांवर तुम्हाला ब्लॅक फिनिश पाहायला मिळणार आहे. ही गाडी पूर्णपणे ब्लॅक असणार आहे, मात्र काही ठिकाणी रेड कलरचा वापर करण्यात आला असून यामुळे ही गाडी अजूनच क्लासी दिसणार आहे.
फक्त एक्सटेरियरच नाही तर इंटेरियर मध्ये देखील ब्लॅक थीमचा वापर अधिक राहणार आहे. मात्र, या गाडीचे इंजिन मध्ये कोणताच बदल केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
सध्याच्या मॉडेल मध्ये जे इंजिन आहे तेच इंजिन आगामी नाईट एडिशन साठी देखील वापरले जाणार आहे. म्हणजे यात 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन येईल, जे की 81bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करणार आहे.
यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध असतील. तथापि, नाइट एडिशन सीएनजी व्हेरियंटसह येईल की नाही ? यावर अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर आलेली नाही.
ही गाडी कधी लॉन्च होणार या संदर्भातही अजून माहिती हाती आलेली नाही. मात्र लवकरच या गाडीची लॉन्चिंग डेट आणि गाडीचा सविस्तर तपशील समोर येणार अशी आशा आहे.