Tata Sierra SUV हफ्त्यावर खरेदी करण्याचा विचार करताय ? मग किती डाउन पेमेंट करावं लागणार, संपूर्ण गणित समजून घ्या

Tata Sierra SUV : सध्या कार प्रेमींमध्ये टाटाची अलीकडेच लॉन्च झालेली Tata Sierra SUV बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ही कंपनीची एक बहुचर्चित कार आहे. या कारची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती आणि अखेर नुकत्याच काही दिवसांपूर्वी ही कार सर्वसामान्य ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे.

दरम्यान जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

ही गाडी ज्यांना हप्त्यावर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण ही गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना किती डाऊन पेमेंट करावे लागू शकते याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.

गाडीची किंमत काय आहे 

ज्या गाडीची ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते ती टाटा सिएरा अखेर लाँच करण्यात आहे. टाटा मोटर्स ने एका मेगा इव्हेंट मध्ये हे गाडी लॉन्च केले आणि या गाडीची बुकिंग देखील आता सुरू झाली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दहा दिवसांपूर्वी अर्थात 16 डिसेंबर 2025 पासून या गाडीसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे आणि या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. ही गाडी सोशल मीडियामध्ये देखील मोठा धुमाकूळ घालताना दिसत आहे

सध्या या गाडीच्या रील मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. एकतर भारतात अलीकडील काही वर्षांमध्ये एसव्ही गाड्यांची मोठी मागणी वाढली आहे आणि त्यात आता टाटा कंपनीने ही गाडी लॉन्च केली असल्याने ज्यांना SUV खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे.

आता तुम्हाला पण ही गाडी घ्यायची असेल मात्र तुमच्याकडे पुरेसं बजेट नसेल आणि तुम्हाला ही गाडी हप्त्यावर घ्यायची असेल तर आज आपण या गाडीच्या संपूर्ण फायनान्स प्लॅनची माहिती घेणार आहोत.

त्याआधी आपल्याला गाडीची किंमत माहिती असणे आवश्यक आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर गाडीच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 11.49 लाख रुपये एवढी आहे आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.49 लाख रुपये इतकी आहे. आता आपण या गाडीचे बेस मॉडेल फायनान्स केले तर कितीचा हप्ता भरावा लागणार आणि किती डाऊन पेमेंट कराव लागणार याचं कॅल्क्युलेशन पाहुयात.

किती डाऊन पेमेंट लागेल?

जर तुम्ही बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला किमान दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला उरलेल्या रकमेवर नऊ टक्के व्याज दराने कर्ज मंजूर होऊ शकत. समजा 9% व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज मंजूर झालं तर ग्राहकांना 23 हजार 751 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो. तरी तुम्हाला ही गाडी फायनान्सवर खरेदी करायची असेल तर तुम्ही एकदा अधिकृत डीलरशिपशी संपर्क साधायला हवा.