Tata SUV Car News : टाटा मोटर्स ही भारतातील एक आघाडीची कार निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या वाहनांची ग्राहकांमध्ये मोठी चर्चा असते. ग्राहकांकडून टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळतो. दरम्यान, याचं लोकप्रिय कंपनीने आता आपल्या जूनच्या विक्रीचा ब्रेकअप डेटा जाहीर केला आहे. यामध्ये जून महिन्यात कोणत्या कारची किती विक्री झाली आहे हे समोर आले आहे. खरेतर टाटा मोटर्स ही देशातील एकमेव कंपनी आहे जिच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक मॉडेल्सचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा आत्तापर्यंत कोणीच हात पकडलेला नाही. म्हणजे या सेगमेंटमध्ये टाटा कंपनी ही बॉस आहे. या कंपनीने सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. हेच कारण आहे की ते देशातील इलेक्ट्रिक चारचाकी सेगमेंटमध्ये गेल्या काही काळापासून आघाडीवर आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांनी टाटा कंपनीच्या आणखी काही इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात लॉन्च केल्या जाणार आहेत. दरम्यान, कंपनीने जून महिन्याच्या आपल्या वाहनाच्या विक्रीचा एक ब्रेकअप डाटा दिला आहे. या डेटामध्ये टाटा पंच या SUV कारची सर्वात जास्त विक्री झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टाटा मोटर्सच्या जून महिन्यातील सेलबद्दल बोलायचे झाल्यास, पंचचे 18,238 युनिट्स, नेक्सॉनचे 12,066 युनिट्स, टियागोचे 5,174 युनिट्स, अल्ट्रोझचे 3,937 युनिट्स, सफारीचे 1,394 युनिट्स, टिगोरचे 1,371 युनिट्स आणि हॅरीयरचे 1,347 युनिट्स विकले गेले आहेत. अशा प्रकारे कंपनीने जूनमध्ये एकूण 43,527 वाहनांची विक्री केली.
मात्र, टाटासाठी ही या वर्षातील सर्वात कमी विक्री आहे. जानेवारीमध्ये 53,635 युनिट्स, फेब्रुवारीमध्ये 51,270 युनिट्स, मार्चमध्ये 50,105 युनिट्स, एप्रिलमध्ये 47,885 युनिट्स आणि मेमध्ये 46,700 युनिट्सची विक्री झाली होती. तथापि, जून महिन्यात टाटा पंचने बाजी मारली आहे. यामुळे आता आपण टाटा पंच या एसयूव्ही कारचे फीचर्स आणि किमती बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
टाटा पंचचे फीचर्स, स्पेसिफिकेशन अन किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा पंचमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. हे इंजिन 6000 rpm वर 86 PS ची कमाल पॉवर आणि 3300 rpm वर 113 Nm चे पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. याशिवाय ग्राहकांना 5-स्पीड एएमटीचा पर्यायही मिळतो. म्हणजे ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिकमध्ये 18.82 kmpl मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टाटा पंचमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक आणि क्रूझ कंट्रोल यांसारखे अद्यावत फीचर्स अपलोड आहेत.
यामुळे ही कार अल्प कालावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो सर्वत्र या कारची मोठी डिमांड पाहायला मिळते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही टाटा पंच एक उत्कृष्ट कार सिद्ध झाली आहे. ग्लोबल NCAP कडून सुरक्षेसाठी या कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. विशेष म्हणजे या गाडीची किंमतही खिशाला परवडणारी असे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 6.13 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.