Tata पुन्हा मार्केट काबीज करणार ! 2026 मध्ये लॉन्च होणार तीन नवीन SUV

Tata Upcoming Car : नव्या वर्षात नवी कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टाटा कंपनी पुढील वर्षात तीन नवीन एसयुव्ही लॉन्च करणार आहे.

यामुळे जर तुम्हाला नवीन एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये अधिक पर्याय पाहायला मिळणार आहेत. अलीकडे भारतात एसयूव्ही कार ची मागणी वाढली आहे.

यामुळे विविध ऑटो कंपनी SUV कारच्या निर्मितीवर फोकस करत आहेत. टाटा मोटर्स ही देशातील सर्वाधिक मोठी स्वदेशी कंपनी. अलीकडे कंपनीने आपले एक लोकप्रिय आणि बहुचर्चित मॉडेल लॉन्च केले. Tata Sierra एसयूव्ही लाँच केल्यापासून टाटा मोटर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Tata Sierra मुळे टाटाने खऱ्या अर्थाने जबरदस्त वापसी केली आहे. दरम्यान आता टाटा मोटर्स 2025 प्रमाणेच 2026 पण गाजवणार असे दिसते. पुढील वर्षात एकापाठोपाठ 3 अशा जबरदस्त गाड्या कंपनीकडून लॉन्च केल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण पुढील वर्षी आता टाटा कंपनीच्या लॉन्च होणाऱ्या या गाड्यांबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 

Tata Punch EV : टाटा मोटर्स पुढील वर्षी Tata Punch EV चे अपडेटेड मॉडेल लॉन्च करणार असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे 2026 च्या पहिल्या सहामाहीतच ही गाडी ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. या गाडीच्या डिझाईन मध्ये आणि फीचर्स मध्ये फारसे बदल होणार नाहीत पण काही सॉफ्टवेअर अपडेट होऊ शकतात.

ही अपडेटेड गाडी एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 490 किलोमीटर पर्यंत चालणार असा दावा होतोय. खरंतर इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे आणि आता पुन्हा एकदा कंपनी आपला हा सेगमेंटच स्ट्रॉंग बनवणार आहे. 

Tata Sierra EV : Tata Sierra ही कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली लोकप्रिय SUV आहे. आता या गाडीचे इलेक्ट्रिक वर्जन देखील लाँच होणार आहे. या गाडीचे इलेक्ट्रिक व्हर्जन 2026 मध्ये येईल.

ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्ह प्रकारात लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी अर्थातच 26 जानेवारी रोजी ही गाडी ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 450 ते 550 किलोमीटरची रेंज देऊ शकते. 

Tata Avinya EV : या यादीत तिसऱ्या क्रमांकावर Tata Avinya EV येते. ही कंपनीची एक फ्युचर कन्सेप्ट कार आहे. अलीकडेच दिल्लीतील एका ऑटो शो मध्ये या गाडीची झलक पाहायला मिळाली होती.

आता 2026 मध्ये ही गाडी प्रत्यक्षात ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे. या गाडीची बॅटरी फक्त 30 मिनिटात फुल चार्ज होईल आणि एकदा चार्ज केल्यानंतर 500 km ची रेंज देण्यास ही गाडी सक्षम राहील असा दावा केला जातोय.