कार्बनचे उत्सर्जन होते. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करावी लागते. यामुळे आयातीवरील खर्च देखील आता मोठा वाढू लागला आहे. हेच कारण आहे की, शासन आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करत आहे.
यामुळे आता भारतातील अनेक नामांकित ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. बाजारात इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाइक्स मोठ्या प्रमाणात लाँच झाल्या आहेत.
अशातच आता इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा लवकरच एक मोठा धमाका करणार आहे. कंपनी लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार अशी बातमी समोर आली आहे.
खरे तर कंपनीने नुकतेच टाटा पंच इलेक्ट्रिक लॉन्च केली आहे. त्यामुळे कंपनीचा इलेक्ट्रिक कार सेगमेंटचा पोर्टफोलिओ चांगला मजबूत होऊ लागला आहे. अशातच, आता हा पोर्टफोलिओ आणखी दमदार बनवण्यासाठी टाटा कंपनी इलेक्ट्रिक अल्ट्रोज 2025 पर्यंत बाजारात लॉन्च करणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
ही कंपनीची सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार म्हणून ओळखली जाते. ही इलेक्ट्रिक गाडी 2019 मध्ये जेनेवा मोटर शो मध्ये सादर करण्यात आली होती. त्यावेळी ही कार जवळपास रेडी मॉडेलच्या जवळ पोहोचलेली होती. या नव्याने लॉन्च होणाऱ्या कार मध्ये पंच इलेक्ट्रिक प्रमाणेच दोन बॅटरी पॅक राहणार आहेत.
या नव्याने लॉन्च होणाऱ्या कारची रेंज किती राहणार, किंमत किती राहणार याबाबत अजून कोणतीचं माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही कार 421 किलोमीटर पर्यंत रेंज देणार असा दावा होत आहे. या गाडीची किंमत ही 11 लाख ते 15.50 लाख रुपयांपासून सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे. पण अजून कंपनीकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.